मानिला
शहरमानिला : फिलिपीन्सची राजधानी व प्रमुख बंदर. देशाचे आर्थिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक केंद्र, लोकसंख्या १६,३०,४८५; महानगरीय ५९,२५,८८४ (१९८०). उत्तर फिलिपीन्समधील लूझॉन या मोठ्या बेटाच्या नैर्ऋत्य भागात, मानिला उपसागाराच्या पूर्व किनाऱ्यावर, पसीग नदीच्या त्रिभुज प्रदेशात मानिला वसलेले आहे.