मदुराई
मदुराई : तमिळनाडू राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्यातील मीनाक्षी मंदिरासाठी ख्याती पावलेले औद्योगिक व सांस्कृतिक शहर, लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यातील मद्रास व कोईमतूर यांखालोखालचे हे तिसर्या क्रमांकाचे शहर (९,०४,३६२-१९८१) आहे. तिरू- चिरापल्लीच्या नैर्ऋत्येस ११३ किमी. वरील हे शहर वैगई नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शहराच्या दक्षिणेला नारळीच्या मोठ्या बागा आहेत.