पालनपूर संस्थान
पालनपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील जुन्या मुंबई इलाख्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ ४५२८.६४ चौ.किमी. लोकसंख्या सु. ३,१५,८५५ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. ३४ लाख रुपये. जोधपूर व सिरोही ही उत्तरेस राजपूत संस्थाने, पूर्वेस सिरोहीचा काही प्रदेश व दांता संस्थान, दक्षिणेस बडोदे आणि पश्चिमेस पालनपूर एजन्सीमधील इतर संस्थाने यांनी ते सीमित झाले होते.