नीस
फ्रान्सच्या आल्प्स मॅरिटाइम (डिपार्टमेंट) प्रांताची राजधानी आणि भूमध्य समुद्रावरील पर्यटनकेंद्र व बंदर. हे पॅरिसच्या आग्नेयीस सु. ६७६ किमी. व मार्सेच्या पूर्वईशान्येस १५८ किमी. वर असून पाइआँ नदीमुखाशी अँजेस दे उपसागरावर वसले आहे. लोकसंख्या ३,४४,४८१ (१९७५). इ. स. पू. सु. ३५० मध्ये ग्रीकांनी हे वसविले.