जयपूर संस्थान
जयपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील राजस्थानमधील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ ३८,९५० चौ. किमी., लोकसंख्या तीस लाखावर (१९४१) आणि वार्षिक उत्पन्न सु. १,२९,७७,००० रुपये. उत्तरेस बिकानेर, लोहारू, पतियाळा; पश्चिमेस बिकानेर,जोधपूर, किशनगढ ही संस्थाने व ब्रिटिशांकित अजमेर जिल्हा; दक्षिणेस उदेपूर, बूंदी, टोंक, कोटा, ग्वाल्हेर व पूर्वेस करौली, भरतपूर,अलवर संस्थाने यांनी सीमित झाले होते.