वायुछिद्र
सागरी लाटांचे खननकार्य व हवेचा दाब यांमुळे किनाऱ्यावर निर्माण होणारा भूविशेष.
समुद्रकडे व समुद्रगुंफा निर्माण होणाऱ्या चबुतऱ्यासारखी सपाटमाथ्याची भूरचना असणाऱ्या किनारी प्रदेशात काही वेळा वायुछिद्र हे भूरूप निर्माण होते. खोल पाणी असणाऱ्या समुद्रकड्यांच्या भागात समुद्राच्या लाटा पूर्ण शक्तीनिशी कड्यावर आदळतात.