অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केबल छिद्रक कीटक

केबल छिद्रक कीटक

  • या कीटकाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रौढ कीटक दूरध्वनीच्या केबलीवरील ३ मिमी. जाड शिशाच्या आवरणाला भोके पाडतो.
  • याचे शास्त्रीय नाव स्कोबिसिया डेक्लिव्हिस आहे. याचा समावेश कोलिऑप्टेरा गणातील बॉस्ट्रिकिडी कुलात होतो.
  • तो रंगाने तपकिरी, ५ मिमी. लांब व चिवट असतो. अंड्यातून बाहेर पडणारे डिंभक (अळ्या) सामान्यतः ओक, मॅपल आणि इतर वृक्षांच्या लाकडाला भोके पाडतात.
  • हा कीटक केबलीला भोके पाडताना तीतील काहीही भाग खात नाही असे दिसते. भोकांचा व्यास सु. २.५ मिमी. असतो.
  • या भोकातून केबलीमध्ये बाष्प किंवा पाणी शिरून मंडल संक्षेप (शॉर्ट सर्किट) होतो, त्यामुळे दूरध्वनी सेवेत व्यत्यय येतो. पुष्कळदा विद्युत् निरोधक पाणी शोषून घेतो व त्यामुळे निकामी होतो.
  • त्यामुळे दूरध्वनी सेवा बराच काळ नादुरुस्त राहते व त्यासाठी तारांना जोड द्यावे लागतात आणि पुन्हा निरोधक आवरण द्यावे लागते.
  • या कीटकाने १०० मी. लांबीच्या केबलीला ३७५ पर्यंत भोके पाडल्याचे उदाहरण आढळून आले आहे.
  • लेखक-द. र.रानडे
  • स्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate