मेंदोसा
मेंदोसा : अर्जेंटिनाच्या पश्चिम भागातील याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६,०५,६२३ (१९८०).हे अँडीज पर्वताच्या स्यीरा दे लॉस ला पारामियोस या दुय्यम पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी, मेंदोसा नदीखोऱ्यात, सस. पासून ७६१ मी. उंचीवर वसले आहे. चिलीमधून आलेल्या स्पॅनिशांनी १५६० मध्ये या शहराची स्थापना केली. १७७६ पर्यंत या ठिकाणावर त्यांचाच ताबा होता.