गरोदरपणाची सूचना मासिक पाळी चुकण्यावरून मिळते. गेल्या मासिक पाळीचा पहिला दिवस निश्चित करा व त्यावेळीची (तिथी, वार, तारीख) नोंद करून घ्या. या तारखेपासून अंदाजे 280 दिवस, म्हणजे नऊ मराठी महिने आणि दहा दिवस झाल्यावर प्रसूती होते. उदा. पाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा) हा शेवटच्या पाळीचा पहिला दिवस धरला तर मार्गशीर्षाच्या शेवटी नऊ मराठी महिने पूर्ण होतात. पुढच्या महिन्यात म्हणजे पौषाच्या दहाव्या दिवशी बाळंतपणाची तिथी येईल.
इंग्रजी महिने मोजायचे असल्यास पूर्ण नऊ महिने व सात दिवस मोजावे लागतात. इंग्रजी महिन्याची तारीख आठवत असल्यास पुढचे नऊ महिने व सात दिवस मोजावेत. उदा. शेवटच्या पाळीचा पहिला दिवस एक जानेवारी असल्यास आठ ऑक्टोबरला बाळंतपणाची 'अंदाजे' तारीख असेल. गेल्या पाळीची तारीख महत्त्वाची आहे.
या हिशेबात सर्वसाधारणपणे एखादा आठवडा मागे-पुढे होतो. तसेच पाळीच्या तारखा,तिथी नीट न आठवल्याने हिशेब चुकू शकतो. पण तिथी, महिना बरोबर आठवल्यास साधारण अंदाज करता येतो. सोबत दिलेल्या कॅलेंडरच्या मदतीने पाळीच्या तारखेवरून बाळंतपणाची संभाव्य तारीख काढता येईल.
पाळीच्या तारखेवरून बाळंतपणाची तारीख काढण्यासाठी तालिका (तक्ता (Table) पहा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/5/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...