অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग

कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग

प्रस्तावना

कुटुंब नियोजन साधनाचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो

कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग

  • गरोदरपण लांबवण्यास उपयोग होतो.
  • संतती नियमाच्या साधनांचा उपयोग दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी होतो.
  • अनेक वेळा गरोदर राहिल्यानंतर पुढील गर्भधारणा टाळण्याकरिता होतो.
  • प्रसुतिपश्चात मातेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
  • प्रसुतिनंतर प्रशिक्षित व्यक्तिकडून (डॉक्टर, नर्स,प्रशिक्षित दाई ) यांचेकडून नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पहिले ८ ते १० दिवस रोज तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर ६ आठवड्यांपर्यंत दर आठवडयाला तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला तपासणी होणे आवश्यक आहे.
  • प्रसुतिपश्चात काळात जनेनेन्द्रीयांचा जंतूदोष टाळण्यासाठी स्वच्छ कपडे व वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  • प्रसुतिनंतर लवकरात लवकर (त्वरीत) स्तनपान चालू करावे. ते माता व बालक या दोघांच्याही फायदयाचे आहे. प्रसुतीनंतर लगेच किंवा नंतर केव्हाही रक्तस्रावाचे प्रमाण जास्त वाटल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • जास्त प्रमाणात ताप येणे, झटके येणे, शुद्ध हरपणे, अशी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे.
  • प्रसुतिपश्चात काळात पुरेसा चौरस व सकस आहाराची गरज आहे. व तो मातेला दिला पाहिजे.
  • रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी १०० दिवसांपर्यंत लोहयुक्त गोळ्या घेणे आवश्यक आहे.
  • १ ते २ महिन्यानंतर हळूहळू पूर्वीचे सर्व कामकाज सुरु करावे.
  • प्रसुतिपश्चात काळात मातेची योग्य काळजी घेऊन मातामृत्युचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते.
  • पाळणा लांबविण्याचा वा थांबविण्याचा योग्य सल्ला देऊन त्यासाठी मातेला प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
  • कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया स्त्री व पुरुष या दोघांना करता येऊ शकते.

 

स्त्रोत : कुटुंब नियोजन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate