घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घटक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
हातपंप विहिरीजवळील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यास एक उत्तम मार्ग म्हणजे परसबाग निर्माण करणे. ह्या परसबागेतल्या भाज्यांचा वापर घरात खाण्यासाठी केल्यामुळे कुटुंबाचे पिषण होण्यास मदत होते.
घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोषखड्डा होय. सांडपाणी मुद्दाम तयार केलेल्या शोषखड्डयात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळु असलेल्या, मुरमाड जमिनीत ह्या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/24/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...