शोषखड्डा कोणीही तयार करू शकतो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. सांडपाण्याची विल्हेवाट होते व आपले आरोग्यही निरोगी राहते. शोषखड्डा कसा करावा हे आपण पुढे पाहणारच आहोत. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.
शोषखड्डा हा निरनिराळ्या लहानमोठया दगडांनी व विटांच्या तुकड्यांनी भरलेला असतो. त्यामुळे शोषखड्ड्याच्या कडा ढासळत नाहीत आणि सांडपाणी त्यात पडले की ते हळूहळू जमिनीत मुरते. खालीलप्रमाणे मापे घेवून शोषखड्डे तयार करता येतो.
साधारण १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १ मीटर खोल असा खड्डा खणावा. एक तृतीय अंश (१/३) खड्डा मोठया दगडांनी भरावा. हे दगड साधारणपणे १० ते १५ सेंमी. रुंद असावेत. त्यानंतर छोटे दगड घालावेत व एकूण दोन तृतीयांश (२/३) खड्डा भरावा. आतमध्ये २० सेंमी. छोटे विटांचे तुकडे याचा थर देऊन वरून मुरूम टाकून त्यावर वाळूचा थर दयावा. रुंद तोंडचे मडके ठेवावे.
ह्या मडक्याच्या तळाशी छोटी छिद्र असणे आवश्यक आहे. ही छिद्र २ सेंमी. रुंद असावीत. त्यात नारळाच्या शेंड्या, झावळ्या घालाव्यात. उरलेला खड्डा बारीक दगड-गोट्यांनी भरावा, साधारणपणे वरती १० सेंमी. इतकी जागा उरली पाहिजे. त्यावर शहाबादी फरशी टाकून हि जागा वापरता येऊ शकते. काही वर्षांनी शोषखड्डा पूर्ण भरून वाहू लागतो तेव्हा तो उकरून त्यातले दगडगोटे काढून, पुन्हा नवीन शोषखड्डा त्याच जागेवर तयार करता येतो.
अ) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
ब) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
क) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/30/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...