उंदीर,साप,किडे यांच्यापासून सुरक्षितता, उजेड व हवा खेळण्यासाठी खिडक्यांची आणि दरवाज्यांची रचना, ओल न राहणे, इत्यादी अनेक गोष्टी घरबांधणीत बघाव्यात. घराचे जोते पुरेसे उंच ठेवले तर उंदीर व इतर प्राण्यांपासून थोडे संरक्षण मिळते. यामुळे पावसाळयात ओलही रहात नाही.
जमीन सारवण्याऐवजी टाईल्स किंवा सिमेट कोबा केल्यास स्वच्छता राहू शकते. सिमेंट कोब्याचा खर्च फार येत नाही. खिडक्या पुरेशा व समोरासमोर असल्यास हवा खेळती राहते आणि घर जास्त तापत नाही. याच दृष्टीने पत्र्याऐवजी कौले असणे फायद्याचे ठरते. मातीच्या भिंतींमुळे घर उन्हाळयात थंड आणि हिवाळयात उबदार राहते. आधुनिक घरबांधणी शास्त्रात यासाठी न भाजलेल्या मातीच्या विटा (थोडे सिमेंट वापरुन) वापरण्याची पध्दत आहे. मात्र अशा मातीच्या विटांच्या भिंतीवर छप्पर पुढे आलेले असले तर पावसापासून संरक्षण मिळते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काह...
निरनिराळया औषधांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योग्य...
चिकणमातीमध्ये फ्लाय व बॉटम ऍशसह काही ताकद देणारे घ...
आपत्तीच्या काळात सार्वजनिक बांधकाम खाते हे महसूल ख...