घरात अंधार आणि कोंदटपणा असला, घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात येत नसेल, घराला ओल येत असेल तर अशा अस्वच्छ वातावरणात उंदीर, माशा, झुरळ, ढेकूण यासारखे रोग पसरवणारे कीटक वाढतात. म्हणून घरामध्ये स्वच्छता राखणे गरजेचे असून त्यासाठी ठळक खालील उपाय करता येतात.
आपल्याकडे शेतकरी कुटुंब असल्यामुळे आपण कोंबड्या, जनावरे, पोपट, मांजर पाळतोच. त्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना स्वतंत्र जागा असल्यास जास्त चांगले असते. ती राहत्या घरापासून थोडी दूर असावीत. प्राण्यांना घरात येण्याची सवय लावू नये. ती घरात येऊन घाण करणार नाहीत असे बघावे कारण ती बाहेर घाणीत हिंडतात व त्यांच्या पायांना व शरीराला घाण लागून रोगजंतू घरात येतात. त्यामुळे सुद्धा रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 4/26/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...