आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात. असे संदेश चेतातंतूमार्फत मेंदूतील योग्य केंद्राकडे पोहोचवले जातात उदा. डोळयाच्या बुबुळातून प्रकाश आत गेला, की बाहेरच्या वस्तूंचे चित्र आतल्या पडद्यावर उमटते. या पडद्यात अत्यंत संवेदनाक्षम पेशींचे जाळे असते. प्रकाशाचा कमी अधिकपणा, वस्तूंच्या चित्रातील रंग, आकार वगैरे गोष्टींची माहिती या पेशींतून चेतातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. तसेच कानातल्या पेशींवर आवाजाच्या लाटा व कंपने आदळली की त्यासंबंधी माहिती मेंदूकडे जाऊन ऐकू येते. जिभेत चव ओळखणारे पेशीगट असतात. तसेच त्वचेवर स्पर्श, तापमान, दाब वगैरे ओळखणा-या पेशी असतात.
ज्ञानेंद्रियात बिघाड होणे, चेतातंतूंमार्फत मेंदूंशी संबंधित भागात बिघाड होणे यापैकी काहीही झाले तर त्या ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे.
श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समत...
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कान...
ध्वनितरंग ऐकून दिलेला प्रतिसाद म्हणजे श्रवणक्रिया ...