कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्थपणा,चिडकेपणाबरोबर अवाजवी आनंदाचे प्रदर्शन या सगळया उन्मादाच्या खाणाखुणा आहेत. याबरोबर कधीकधी असंबध्द बडबडही असते. असे मनोरुग्ण स्वतःच्या किंवा इतरांच्या हत्येला प्रवृत्त होतात. अशा मनोरुग्णांना संयम नसतो. काही मनोरुग्ण अतिखर्चीकपणा करतात. असे उन्मादाचे झटके दोन-तीन महिने टिकतात, जातात व परत येतात.
लग्नानंतर एक-दोन वर्षातच मनोरमाचे बोलणे-वागणे खूप बदलले. ती आता इतरांशी फारशी बोलेनाशी झाली. दिवसभर घरात बसे अथवा आतून कडी लावून कोंडून घेई. कपडयांबद्दल, नीटनेटके दिसण्याबद्दल तिला अजिबात काही वाटत नव्हते. रात्री झोप न लागणे, भूक कमी होणे, इत्यादी त्रासांनी ती आणखी खंगत चालली. नव-याने तिला सोडून दुसरे लग्न केले. याबरोबर तिची लक्षणे वाढत गेली. दिवसदिवस कोणाशी न बोलणे, रडत - कण्हत बसणे, इत्यादी गोष्टी नेहमीच्याच झाल्या. शेवटी तिने घरात कोणी नाही असे पाहून साडीने गळफास घेतला. मनोरमा ही 'अतिनैराश्य' या मनोविकाराने आजारी झाली होती. वेळीच तिच्यावर उपचार झाले असते तर ती वाचू शकली असती आणि बरीही झाली असती. पण यावर उपचार होऊ शकतील ही कल्पनाच कोणाला नव्हती.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी ...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम कर...
दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वा...