अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व 'अतिनैराश्याच्या' खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणांबरोबरच काही शारीरिक लक्षणेही (भूक नसणे, बध्दकोष्ठ, सैलपणा, थकवा, इ.) आढळतात. असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो. मृत्यू हेच औषध आहे अशी त्यांतल्या ब-याच जणांची खात्री असते. अशा दर दहा मनोरुग्णांपैकी एखादा तरी आत्महत्या करतो.
रघुनाथ वकिलांची वकिली हळूहळू बंद झाली. सुरुवातीला अगदी हुशार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंतर त्यांच्यात बदल दिसू लागले. सुरुवातीला खूप बडबड, चिडकेपणा सुरू झाला. त्यानंतर अशीलांना उर्मटपणे बोलणे, आरडाओरड करणे, कामावरचे लक्ष कमी होणे, स्वतःबद्दल अव्वाच्या सव्वा बोलणे, अनोळखी माणसांनाही हसून खेळून सलगी दाखवणे, खूप महत्त्वाकांक्षा, इत्यादी प्रकार दिसून येऊ लागले. आक्रमक बोलणे, वागणे जास्त झाल्यावर व्यवसायाला उतरण लागली. एक-दोन वर्षातच त्यांच्याकडे अशील जाणे थांबले, पण कोर्टात जाणे-येणे चालूच होते. काम मिळेनासे झाल्यावर ही सर्व लक्षणे जास्त वाढली. मध्येमध्ये यामध्ये चढउतार व्हायचे आणि आठवडा-दोन आठवडे चांगले जायचे. डॉक्टरकडून मानसोपचार झाल्यावर हळूहळू त्यांची लक्षणे सौम्य झाली. यानंतर त्यांचे वागणे बरेच सुसह्य झाले. हा 'उन्माद' आजार म्हणता येईल.
उन्माद व अतिनैराश्य या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर औषधोपचाराचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच इतर नातेवाईकांनी मानसिक आधार देऊन समजूतदारपणा दाखवून मनोरुग्णास मदत केली पाहिजे.
उन्माद व अतिनैराश्य ही दोन टोके आहेत. एकाच रुग्णात ही दोन्ही टोके दिसू शकतात. कधी उन्माद तर कधी अतिनैराश्य.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम कर...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणा...
कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्...