या कोशिका विविध ऊतकांत कायम स्वरूपात असतात,
या कोशिका जरूरीप्रमाणे सर्व ऊतकांमध्ये जाऊ शकतात. स्थिर कोशिका वपाजाल (पोटाच्या पोकळीतील दोन अगर अधिक अवयवांना जोडणारा पडदा), परिफुप्फुस (फुप्फुसावरील आवरण) वगैरे ठिकाणी आणि प्लीहा, लसीका ग्रंथी, अस्थिमज्जा, अधिवृक्क ग्रंथी (मूत्रपिंडाच्या वरच्या टोकास असलेली वाहिनीविहीन ग्रंथी). पोष ग्रंथी व तंत्रिका तंत्रातील (मज्जासंस्थेतील) सूक्ष्मश्लेषी कोशिकांत (तंत्रिकेतील भक्षिकोशिकांत) दिसतात. भ्रमणक्षम कोशिका प्लीहा, लसीका ग्रंथी आणि अस्थिमज्जा यांतील रक्तकोटरापाशी (अशुद्ध रक्त असणाऱ्या पोकळ जागेपाशी) असून जरूरीप्रमाणे त्या रक्तप्रवाहाबरोबर शरीरात कोठेही जाऊ शकतात. खुद्द रक्तातील एककेंद्रकीय कोशिकाही याच प्रकारच्या आहेत. या सर्व कोशिका बाह्य पदार्थाभोवती विळखा घातल्यासारख्या पसरून तो पदार्थ पोटात घेऊन पचवून नष्ट करून टाकतात.
(१) रक्तातील निरुपयोगी झालेल्या रक्तकोशिकांचा नाश करून त्यांच्यापासून रक्तारुण (रक्तातील प्रथिनयुक्त रंगद्रव्य, हीमोग्लोबिन) मोकळे करणे.
(२) शरीरात संसर्ग करणाऱ्या जंतूंचा नाश करणे.
(३) शरीरबाह्य प्रथिनजन्य वा जंतुजन्य विषांविरुद्ध प्रतिविषे तयार करणे.
(४) चिरकारी (फार दिवस टिकणाऱ्या) संसर्गी रोगांत रोगजंतूंच्या विरुद्ध प्रतिकार म्हणून या कोशिकांचा जणू एक तटच तयार होतो. त्यांपैकी अनेक कोशिकांचा एकजीव होऊन मोठी अशी एक ‘राक्षशी’ कोशिका तयार होते.
(५) जखमा आणि इजा यांमुळे निरुपयोगी झालेल्या ऊतकाचा नाश करून ग्रस्त जागेचे प्रतिसंस्करण करणे (हानी भरून काढणे).
या कोशिका शरिरात सर्वत्र पसरल्या असल्या, तरी त्यांचे काम अत्यंत सुसूत्रपणे चालते. एका ठिकाणच्या कोशिका निकामी झाल्या, तर दुसरीकडच्या कोशिका ते काम अंगावर घेऊन पार पाडतात.
या तंत्राचा उपयोग म्हणजे शरीराचे स्थैर्य संभाळून बाह्य पदार्थांचा त्रास होऊ न देणे , हा होय.
ढमढेरे, वा. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/6/2020
परिसरात व शरीराच्या विविध भागांत होणाऱ्या बदलांमुळ...
य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र ...
श्वसन, कृत्रिम : वातावरणातील ऑक्सिजन शरीरातील प्रत...
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या...