অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामान्य सर्दी

सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.

सामान्य सर्दी कशी पसरते ?

सामान्यपणे विचार केला तर कळते की खोकला आणि शिंका येण्यामुळं सामान्य सर्दी पसरते, सर्दी पसरविण्यासाठी ही खरंतर अगदी किरकोळ कारणं आहेत. सर्दी-पडसे एका जातीच्या विषाणूंमुळे (किंवा काही वेळा वावडयामुळे) होते. हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुस-याकडे सहज पसरतात. एक-दोन दिवसांत त्यालाही सर्दी सुरू होऊ शकते. या विषाणूंविरूध्द थोडीफार प्रतिकारशक्ती तयार झाली तरी ती अल्पजीवी असते म्हणून, त्याच व्यक्तीला पुन्हापुन्हा सर्दी होऊ शकते

सामान्य सर्दीचा थंड हवेशी संपर्क होण्याशी काही संबंध आहे काय ?

थंड वातावरणात बाहेर जाणे याचा सर्दीच्या प्रसारावर काही प्रभाव होत नाही. याचं कारण असं की थंड हिवाळी वातावरणात लोक घरातच राहणं जास्त पसंत करतात.  वस्तुतः, तथापि, बाहेरच्या हवामानापेक्षा, लोकांचा एकमेकांशी निकटचा संपर्क हेच मुख्य कारण असल्याचे दिसते.  याच कारणासाठी, पाळणाघर किंवा किंडरगार्टनमधल्या मुलांना सर्दी होण्याची अधिक शक्यता असते.

उपचार

व्हायरसजन्य सर्दीसाठी प्रतिव्हायरस औषधे उपलब्ध नसल्याने व या प्रकारच्या सर्दीचा कालावधी ठराविक असल्याने फक्त लक्षणानुसारी उपचार (ताप, अंगदुखी, डोकेदुखी व नाकातून पाणी गळणे कमी होण्यासाठी औषधे) करावे लागतात व सहसा ते पुरेसे असतात. अधिहर्षताजन्य सर्दीसाठी हिस्टामीनरोधक औषधे उपयोगी पडतात. रोगजंतूंच्या प्रादुर्भावामुळे पूयुक्त सर्दी किंवा पुढील इतर उपद्रव झाल्यास योग्य प्रतिजैविक (अँटिबायॉटिक) औषधांचा उपयोग आवश्यक ठरतो.

प्रतिबंध

जीवनसत्त्वयुक्त चौरस आहार व योग्य व्यायामाच्या साहाय्याने शारीरिक आरोग्य राखणे व रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, श्वसनाचे व्यायाम व प्राणायाम, मोकळी स्वच्छ हवा, अतिदमट किंवा अती कोरडी हवा व कोंदट जागी काम करणे टाळावे, अधिहर्षताजनक पदार्थाचा संपर्क टाळण्याचा प्रयत्न करणे इ. प्रतिबंधक उपचार महत्त्वाचे आहेत; परंतु त्यामुळे सर्दी कायमची बंद करणे शक्य नसते. बरेच अधिहर्षताजनक पदार्थ समजून येत नाहीत आणि त्यातील काही न टाळता येणारे असतात. तसेच सर्दीजनक व्हायरस सतत बदलत असल्याने त्यांच्याविरुद्घ प्रतिबंधक लसनिर्मिती शक्य झालेली नाही. परंतु या प्रकारच्या सर्दीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळच्या वेळी उपचार केल्यास सर्दी पूययुक्त होणे व त्यापुढील अनेक प्रकारचे उपद्रव टळू शकतात.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate