श्वसनसंस्थेमध्ये घशापासून ते फुप्फुसातल्या सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत काहीही आजार झाला, की खोकला येण्याची शक्यता असते.
खोकल्याच्या बहुतेक औषधांचा उपयोग होत नाही. मूळ रोगच बरा व्हायला पाहिजे.
न्यूमोनिया किंवा क्षयरोग यात फुप्फुसांचा जंतुदोष होतो. हा जंतुदोष फुप्फुसांच्या दुपदरी आवरणापर्यंत पोचला तर या आवरणासही जंतुदोष होतो.
अनेक प्रकारच्या जंतांच्या जीवनचक्रात सूक्ष्म अळयांच्या अवस्थेत हे जीव रक्तामार्फत फुप्फुसात येतात
'दमा' या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो.
न्यूमोनिया म्हणजे 'फुप्फुसाची सूज' (क्षयरोगाची सूज दीर्घ मुदतीची असते.) न्यूमोनिया हा अचानक येणारा अल्पमुदतीचा तीव्र आजार आहे.
फुप्फुसाचा कर्करोग हा उतार वयातला एक गंभीर आजार आहे. विशेषतः धूम्रपान करणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची 30 पटीने जास्त शक्यता असते.
सर्वांना जन्मतः टॉन्सिल असतातच. टॉन्सिल हे संरक्षक द्वारपालाचे काम करीत असतात. व वयाच्या 10-12 वर्षांपर्यंत ते आकाराने मोठेच असतात.