অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खोकला, छातीत दुखणे

खोकला, छातीत दुखणे

श्वसनसंस्थेमध्ये घशापासून ते फुप्फुसातल्या सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत काहीही आजार झाला, की खोकला येण्याची शक्यता असते. तसेच फुप्फुसदाहाने काही द्रवपदार्थ श्वासनलिकांमध्ये आल्यास खोकला येतो. खोकला म्हणजे श्वसनसंस्थेला नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी होत असलेला प्रयत्न. जेव्हा टाकाऊ पदार्थ फारसा तयार होत नसेल व दाहही होत असेल तेव्हा 'कोरडा' खोकला येतो. याउलट जेव्हा टाकाऊ पदार्थ जास्त असतो तेव्हा 'बेडके' पडतात (याला काही जण 'जड खोकला' किंवा कफ असे म्हणतात)

या बेडक्यातला मुख्य पदार्थ म्हणजे श्वासनलिकांमधून पाझरणारा चिकट द्रव. काही वेळा यात 'पू' किंवा रक्तही पडते. बेडक्याच्या रंगावरून आणि वासावरून आतला रोग काय असेल याचा अंदाज करतात. बेडक्यातून, खोकल्यातून रक्त पडते तेव्हा प्रथम क्षयरोग व मग कॅन्सरची शंका घ्यावी. बेडका हिरवट व पू-मिश्रित असेल तर न्यूमोनिया किंवा फुप्फुसातले गळू हे त्याचे कारण असू शकते.

http://www.arogyavidya.net/arogyavi/tabel010.swf

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 5/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate