साहित्य : गव्हाचे पीठ १ वाटी, तूप ३ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, सुके खोबरे २ छोटे चमचे, पाणी.
कृती : एका कढईत तूप पातळ करून घ्या. त्यात न चाळलेले गव्हाचे पीठ घालून खरपूस भाजून घ्या. नंतर दीड ते २ वाट्या पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर ते भाजलेल्या गव्हाच्या पिठात घाला. पीठ शिजले की त्यात पाऊण वाटी गुळ ( किसलेला ) घालून शिरा चांगला हलवून घ्या. खायला देताना त्यात सुके खोबरे घालून खायला दयावे.
एक मध्यम आकाराची वाटी भरून गव्हाच्या पिठाचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२५८.५० कॅलरी |
कर्बोदके |
४२.०९ ग्राम |
प्रथिने |
०७.०२ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०८.५७ ग्राम |
कॅल्शियम |
४८.३० मि. ग्राम |
लोह |
०२.५१ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
१३.८० मि.ग्राम |
टीप : हा शिरा गव्हाचा रवा (बलगर) वापरून करू शकता. त्यासाठी पाणी जास्त लागते. कृती साहित्य वरीलप्रमाणे.
साहित्य : राजगिरा १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ पाऊण वाटी, पाणी.
कृती : राजगिऱ्याचा रवा काढून घ्या. राजगिऱ्याचा रवा व तूप एकत्र करून खमंग भाजून घ्या. पाणी गरम करून त्यात घाला. राजगिरा शिजल्यानंतर त्यात गुळ घालून सारखा करा आणि खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून राजगिऱ्याचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
७४.६० कॅलरी |
कर्बोदके |
१२.०८ ग्राम |
प्रथिने |
०१.८१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.०४ ग्राम |
कॅल्शियम |
१९७.३० मि. ग्राम |
लोह |
४१.९२ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
१४१९.०० मि.ग्राम |
टीप : राजगिरा हा उष्ण असतो म्हणून हा हिवाळ्यातच खायला दयावा.
साहित्य : वऱ्याचे तांदूळ १ वाटी, साखर १ वाटी/ गुळ १ वाटी, तूप २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे ( किसलेले)
कृती : वऱ्याचा तांदूळ जाडसर दळून घ्या. हे पीठ चाळू नये. पीठ तुपावर तांबुस भाजावे. जेवढे पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालावे आणि नेहमीच्या शिऱ्याप्रमाणे हा शिरा करावा. त्यात सुके खोबरे, साखर/ गुळ घालून हलवून गरम गरम खायला दयावा.
एक मध्यम आकाराची वाटी भरून वऱ्याचा तांदळाचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२१.०६ कॅलरी |
कर्बोदके |
३०.६२ ग्राम |
प्रथिने |
०२.८४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
१२.५३ ग्राम |
कॅल्शियम |
२९.३० मि. ग्राम |
लोह |
००.५६ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
०७.७३ मि.ग्राम |
साहित्य : गव्हाचा रवा २ वाटया, तूप २ मोठे चमचे, गुळ २ वाटया
कृती : तूप व गुळ एकत्र मंद आचेवर ठेवावे. गुळ विरघळल्यानंतर त्याला छोटे बुडबुडे येईपर्यंत थांबा. नंतर त्यात थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घाला आणि हलवत रहा. ह्या सर्व मिश्रणाचा गोळा तयार झाला की खाली उतरवून थाळीत थापून घ्या. नंतर त्याच्या वडया पाडा.
मध्यम आकाराच्या २-३ गव्हाच्या पौष्टिक वडया खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२२३.९० कॅलरी |
कर्बोदके |
४१.१७ ग्राम |
प्रथिने |
०३.७१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.५३ ग्राम |
कॅल्शियम |
३०.४० मि. ग्राम |
लोह |
०२.०० ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
१०.५० मि.ग्राम |
टीप : गव्हाच्या पिठाऐवजी बाजरीचे पीठ वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.
साहित्य : चणा १ वाटी, जाड पोहे २ वाटया, कांदा १ वाटी, हिरव्या मिरच्या ३-४, कढीपत्ता १५-२० पाने, लिंबाचा रस १ मोठा चमचा, तेल ३ मोठे चमचे, मीठ, साखर चवीप्रमाणे, फोडणीचे साहित्य, खोबरे व कोथिंबीर हवी असल्यास.
कृती : चणा डाळ २ ते ३ तास भिजवून जाडसर वाटून घ्या. पोहे धुऊन ठेवा. तेलाची फोडणी करून मिरच्याचे तुकडे, कढीपत्ता, चिरलेला कांदा घालून परतून घ्या. वाटलेली डाळ घालून ढवळून वाफ दया. पोह्यावर मीठ, साखर घालून कालवा आणि फोडणीत घाला. नंतर लिंबाचा रस घालून हलवून घ्या आणि गरम गरम खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून डाळ पोहे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१८६.०० कॅलरी |
कर्बोदके |
२३.८८ ग्राम |
प्रथिने |
०४.०६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.९२ ग्राम |
कॅल्शियम |
११.६० मि. ग्राम |
लोह |
०६.५३ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
१५.९८ मि. ग्राम |
टीप : चणा डाळीच्या ऐवजी तुम्ही मोड आलेली कडधान्ये, ताजा हरभरा, ताजे मटार, कोबी, गाजर इ. चे तुकडे वापरू शकता. कोबी वापरल्यास कांदा वापरण्याची गरज नाही.
साहित्य : जाड पोहे २ वाटी, चणा डाळ अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेली काकडी १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, हिरवी मिरची १ मोठा चमचा बारीक चिरलेली, कोथिंबीर १ वाटी, लिंबाचा रस २ मोठे चमचे, चवीपुरते मीठ आणि साखर तेल १ मोठा चमचा.
कृती : चणाडाळ २ ते ३ तास भिजत घालून – निथळून पाणी न घालता किंचित मीठ चोळून ठेवा. मोड आलेल्या मुगाला सुद्धा मीठ चोळून पाणी न घालता कुकरमध्ये शिजवून घ्या. १ मोठा चमचा तेल घालून त्यात पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. पोहे गरम असतानाच मीठ साखर लावून ठेवा. खायला देताना पोहे, छान डाळ, मूग काकडी, कांदा, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस एकत्र करून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून पोहे भेळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१४१.७५ कॅलरी |
कर्बोदके |
९०.८० ग्राम |
प्रथिने |
०५.५१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.९१ ग्राम |
कॅल्शियम |
३९.४५ मि. ग्राम |
लोह |
०४.९६ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
३३.५५ मि. ग्राम |
टीप : चणा डाळ नको असल्यास तुम्ही वगळू शकता. खायच्या वेळेलाच भेळ कळवावी. अन्यथा सादळते.
साहित्य : ज्वारीच्या लाह्या १ वाटी, साळीच्या लाह्या १ वाटी, राजगिरा लाह्या, मक्याच्या लाह्या १ वाटी, मोड आलेले मूग १ वाटी, कच्चा कोबी अर्धी वाटी, काकडी पाव वाटी, कोथिंबीर २ मोठे चमचे, लिंबाचा रस १ मोठा चमचा. मीठ साखर चवीप्रमाणे
कृती : खायला द्यायच्या वेळेला सर्व पदार्थ एकत्र करून चांगले कालवून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून पौष्टिक भेळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
४८.३३ कॅलरी |
कर्बोदके |
२०.२५ ग्राम |
प्रथिने |
०१.७० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.२५ ग्राम |
कॅल्शियम |
२५.०७ मि. ग्राम |
लोह |
००.८८ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
३६७.४४ मि. ग्राम |
साहित्य : नाचणी १ वाटी, हरभरा डाळ पाव वाटी, शेंगदाणे पाव वाटी, बारीक केलेली हिरवी मिरची ३-४, कोबी व गाजराचे तुकडे अर्धी वाटी, मीठ चवीप्रमाणे, तेल १ चमचा, फोडणीचे साहित्य.
कृती : नाचणी ५-६ तास भिजत घालावी. हरभरा डाळ आणि शेंगदाणे भिजवून ठेवावे. नाचणीचे पाणी काढून पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्यावेत. कढईत तेल घालून फोडणी करून घ्यावी. त्या फोडणीत भाज्यांचे तुकडे शिजवून घालावेत. नंतर नाचणी घालून त्यात मीठ, हिरवी मिरची, भिजवलेली डाळ व दाणे घालून परतावे. त्यावर कोथिंबीर घालून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून नाचणी उपमा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१४५.३४ कॅलरी |
कर्बोदके |
३३.६४ ग्राम |
प्रथिने |
२५.१६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०२.६७ ग्राम |
कॅल्शियम |
११७.८० मि. ग्राम |
लोह |
०२.८८ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
३३.५० मि. ग्राम |
साहित्य : १ मोठी वाटी भरून साळीच्या लाह्यांचा रवा, कढीपत्ता ४-५ पाने, जिरे अर्धा चमचा, हळद पाव चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा, तेल अर्धा चमचा.
कृती : साळीच्या लाह्या बारीक करून घ्या. अर्धा चमचा तेल कढईत टाकून त्यात जिरे, हळद, कढीपत्ता घालून सर्व हलक्या हाताने भाजा. मग त्यात पाव वाटी पाणी घालून अंदाजे मीठ घाला. नंतर लाह्याचा रवा घालून हलक्या हाताने हलवून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून साळीच्या लाह्यांचा उपमा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१००.०८ कॅलरी |
कर्बोदके |
२०.८८ ग्राम |
प्रथिने |
०३.४५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३९ ग्राम |
कॅल्शियम |
०७.८० मि. ग्राम |
लोह |
००.५० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०३.०० मि. ग्राम |
साहित्य : सोयाबीन २ वाटया, हळद पूड १ छोटा चमचा, तेल २ चमचे, मीठ चवीप्रमाणे.
कृती : २ ते ३ तास सोयाबीन पाण्यात भिजवून ठेवा. नंतर बाहेर काढून पाणी निथळून घ्या. निथळलेल्या सोयाबीनला मीठ व हळद लावून रात्रभर थंड जागेत ठेवा. सकाळी त्या दाण्यांना तेल लावून थोडे थोडे कढईत घेऊन मंद आचेवर भाजून कुरकुरीत झाले की काढून घ्या.
मुठ भरून सोयाबीन चटपटीत दाणे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१७४.६० कॅलरी |
कर्बोदके |
१०.४५ ग्राम |
प्रथिने |
२१.६० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
१४.७५ ग्राम |
कॅल्शियम |
१२०.०० मि. ग्राम |
लोह |
०५.२० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
२१३.०० मि. ग्राम |
साहित्य : गव्हाचा जाडसर रवा १ वाटी, भिजवलेले शेंगदाणे अर्धी वाटी, हिरवी मिरची २-३, कढीपत्ता ८ ते १० पणे, कांदा बारीक चिरलेला १, चवीप्रमाणे मीठ व साखर, तेल १ मोठा चमचा, फोडणीचे साहित्य आणि १ चमचा उडदाची डाळ.
कृती : गव्हाचा जाडसर रवा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. त्यात पाणी घालून चांगले शिजवून घ्या. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद, उडदाची डाळ, कढीपत्ता, मिरच्या, कांदा, भिजवलेले दाणे घालून चांगले परतवून घेणे. शिजवलेला गव्हाचा रवा फोडणीत घाला व चांगले हलवा. लिंबाचा रस, मीठ, साखर घालून आणि खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून गव्हाच्या रव्याचा उपमा (दलिया) खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
१००.०८ कॅलरी |
कर्बोदके |
२०.८८ ग्राम |
प्रथिने |
०३.४५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३९ ग्राम |
कॅल्शियम |
०७.८० मि. ग्राम |
लोह |
००.५० ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०३.०० मि. ग्राम |
टीप : गव्हाच्या रव्याऐवजी बाजरीचा रवा आपण वापरू शकता. कृती आणि साहित्य वरीलप्रमाणे.
साहित्य : शेंगदाणे २ वाटया, गुळ दीड वाटी, तेल २ छोटे चमचे
कृती : ही चिक्की दोन प्रकारे करता येते. अख्ख्या शेंगदाण्याची किंवा दाणे बारीक करून दाण्याच्या कुटाची. शेंगदाणे भाजून घ्या. गुळ बारीक करून घ्या. कढईत दोन छोटे चमचे तेल घाला. त्यात चिरलेला गुळ विरघळेपर्यंत थांबा. गुळाला बारीक बुडबुडे आल्यानंतर त्यात शेंगदाणे कूट घाला. हलवून लगेचच तेल लावलेल्या ताटात घालून घ्या आणि सुरीने कापून वडया पाडा.
एक मध्यम आकाराच्या २-३ वडया खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९५.३० कॅलरी |
कर्बोदके |
१२.१७ ग्राम |
प्रथिने |
०२.६६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.९९ ग्राम |
कॅल्शियम |
१५.७० मि. ग्राम |
लोह |
००.५७ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
०२.२१ मि. ग्राम |
साहित्य : भाजलेले शेंगदाणे १ वाटी, तूप २ छोटे चमचे, गुळ बारीक चिरलेला १ वाटी
कृती : भाजलेले शेंगदाणे, गुळ एकत्र करून खलबत्त्यात कुटावे. शेंगदाणे बारीक झाल्यावर सर्व मिश्रण चांगले कालवून त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. कुटलेले मिश्रण कोरडे झाले असेल तर त्यात थोडेसे तूप मिसळा आणि लाडू वाळा.
मध्यम आकाराचा एक लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९५.३० कॅलरी |
कर्बोदके |
१२.१७ ग्राम |
प्रथिने |
०२.६६ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.९९ ग्राम |
कॅल्शियम |
१५.७० मि. ग्राम |
लोह |
००.५७ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
०२.२१ मि. ग्राम |
साहित्य : नाचणी चीक १ वाटी, दूध १ वाटी, तूप २ मोठे चमचे, गुळ १ वाटी बारीक चिरलेला.
कृती : दुधात चिरलेला गुळ घालून तो विरघळल्यानंतर त्यात नाचणीचा चीक घाला. कढईत तूप घालून वरील सर्व मिश्रण कढईत घाला. सारखे हलवत राहा. ह्या मिश्रणाचा गोळा होऊन तुओ सुटेपर्यंत हलवा आणि लगेच तो गोळा ताटलीत थापून त्याच्या वडया कापा.
एक मध्यम आकाराची वाटी भरून नाचणीचा हलवा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्य मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९६.९५ कॅलरी |
कर्बोदके |
११.९६ ग्राम |
प्रथिने |
००.७५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.१३ ग्राम |
कॅल्शियम |
३८.४० मि. ग्राम |
लोह |
००.५२ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०४.२० मि. ग्राम |
टीप : नाचणीचा चीक कसा काढायचा ह्याची कृती नाचणीच्या कुरडईच्या कृतीप्रमाणे करावी. गव्हाच्या चिकाचा सुद्धा हलवा करता येतो. कृती साहित्य वरीलप्रमाणे.
साहित्य : कच्ची पपई – पपई साल काढून किसून घ्या. २ वाटया, तूप / तेल २ छोटे चमचे, हिरवी मिरची २-३ बारील चिरलेली, जिरे अर्धा चमचा, दाण्याचे कूट, कोथिंबीर अर्धी वाटी, मीठ साखर चवीप्रमाणे.
कृती : कढईत तेल किंवा तूप आवडीप्रमाणे घ्या. त्यात जिरे मिरची घाला आणि मग त्यात किसलेली पपई घाला. चांगले हलवून मीठ साखर घाला आणि खीस शिजू दया. नंतर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर घालून हलवून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून पपईचा किस खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
७६.२० कॅलरी |
कर्बोदके |
०१.९० ग्राम |
प्रथिने |
०१.४५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०७.०१ ग्राम |
कॅल्शियम |
०६.६५ मि. ग्राम |
लोह |
००.२४ ग्राम |
‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व |
०२.३० मि. ग्राम |
टीप : हा कीस उपवासाला चालतो. पपईप्रमाणे बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस करता येतो. कृती व साहित्य वरीलप्रमाणे.
साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, तूप – दीड मोठा चमचा, गुळ – पाऊण वाटी, सुके खोबरे – २ छोटे चमचे, पाणी २ वाटया.
कृती : तांदळाचा रवा तूप घालून खमंग भाजून घ्या. वेगळ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. भाजलेल्या रव्यात पाणी घालून शिजवा. लगेच त्यात गुळ घाला. शिजल्यानंतर किसलेले खोबरे घाला आणि लगेच खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून तांदळाच्या रव्याचा शिरा खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९८.७५ कॅलरी |
कर्बोदके |
१२.४२ ग्राम |
प्रथिने |
०१.५२ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.१० ग्राम |
कॅल्शियम |
०५.०० मि. ग्राम |
लोह |
००.४५ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
०७.७० मि. ग्राम |
साहित्य : तांदळाचा रवा १ वाटी, लिंबाचा रस – १ छोटा चमचा, कांदा १ लहान, पाणी २-३ वाट्या, मिरची २-३ बारीक चिरलेल्या, कोथिंबीर २ मोठे चमचे, सुके खोबरे २ मोठे चमचे, तेल १ मोठा चमचा. फोडणीचे साहित्य – उडदाची डाळ १ छोटा चमचा, कढीपत्ता ८-१० पाने बारीक चिरलेला, मीठ, साखर चवीप्रमाणे.
कृती : तांदळाचा रवा खमंग भाजून घ्या. नंतर कढईतून रवा काढून ठेवा. वेगळ्या भांडयात पाणी गरम करायला ठेवा. कढईत तेल घालून फोडणी करून त्यात मिरची, कांदा, कढीपत्ता, उडदाची डाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात २ वाटया गरम पाणी घाला. त्या पाण्यात लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. चांगली उकळी आल्यावर त्यात भाजलेला रवा घाला आणि शिजवून घ्या. नंतर त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून खायला दया.
एक मध्यम आकाराची वाटी भरून तांदळाच्या रव्याचा उपीट खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
६७.७० कॅलरी |
कर्बोदके |
०८.५९ ग्राम |
प्रथिने |
०१.०९ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०३.२१ ग्राम |
कॅल्शियम |
२१.०० मि. ग्राम |
लोह |
००.७१ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
०८.५२ मि. ग्राम |
साहित्य : नाचणी १ किलो, मीठ चवीप्रमाणे, पाणी.
कृती : नाचणी ४ दिवस पाण्यात भिजत घाला. गव्हाच्या कुरडया करताना जसे गहू वाटून घेतो तशीच नाचणी वाटून त्याचा चीक काढून घ्या. त्या चिकात चिकाइतके पाणी घालून तो चीक शिजवून घ्या. मीठ घालून चिकाच्या कुरडया तळ्ल्यानंतर खायला दयाव्यात. या कुरडया खूप पौष्टिक असतात.
सर्वसाधारण लहान मुले २ कुरडया खातील. त्यातून मिळणारी पोषण मूल्ये खालीलप्रमाणे.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९८.४० कॅलरी |
कर्बोदके |
०२.१६ ग्राम |
प्रथिने |
०२.१९ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३९ ग्राम |
कॅल्शियम |
१०३.२० मि. ग्राम |
लोह |
०१.१७ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
१२.६० मि. ग्राम |
टीप : गव्हाच्या कुरडईची जशी भाजी करतो तशी ह्या कुरडईची भाजी करू शकतो.
साहित्य : नाचणी पीठ, १ वाटी तेल, पाणी २ वाटया, पापड खार २ छोटे चमचे, साधे मीठ चवीप्रमाणे.
कृती : एका पातेल्यात पाणी, पापडखार, थोडे मीठ हे मिसळून कोमट करून घ्या. या गरम गरम मिश्रणात मावेल तेवढेच नाचणीचे पीठ घालून ढवळून त्याचा गोळा करून घ्या. हा गोळा २ मिनिटे झाकून ठेवा. हे मिश्रण ताटात काढून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. या गोळ्याचे लहान लहान गोळे करून पोळपाटावर खाली प्लास्टिक पेपर पसरून त्यावर गोळा ठेवून त्यावरही प्लास्टिक पेपर ठेवा व पातळ लाटा व स्वच्छ कापडावर उन्हाच्या धगीत परंतु सावलीत वाळवा. हे पापड भाजून खाऊ शकता.
सर्वसाधारण लहान मुले २ नाचणीचे पापड खातील. त्यातून मिळणारी पोषणमूल्ये खालीलप्रमाणे.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
९८.४० कॅलरी |
कर्बोदके |
०२.१६ ग्राम |
प्रथिने |
०२.१९ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३९ ग्राम |
कॅल्शियम |
१०३.२० मि. ग्राम |
लोह |
०१.१७ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
१२.६० मि. ग्राम |
टीप : ह्याच प्रमाणात तांदळाचे पापड सुद्धा करता येतात.
साहित्य :उकडलेली रताळी १ वाटी, गुळ सव्वा वाटी, कणीक, मोठे ४ चमचे तेल, २ मोठे चमचे मीठ, कणकेत घालण्यासाठी.
कृती :रताळे उकडून त्याची साल काढून त्यात गुळ घालून शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळा. नंतर पुरण यंत्रातून मिश्रण काढून घ्या किंवा पाट्यावर वाटून घ्या. कणकेत थोडे मीठ, तेल घालून पीठ थोडे सैलसर भिजवून घ्या. १५ मिनिटांनी कणकेचे छोटे गोळे तयार करा. रताळ्याचे सारण भरून त्याच्या पोळ्या लाटून घ्या. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून खरपूस भाजून घ्या. गरम गरम खायला दया.
रताळ्याची एक पोळी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
६८.७० कॅलरी |
कर्बोदके |
००.७१ ग्राम |
प्रथिने |
१६.०१ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.०८ ग्राम |
कॅल्शियम |
१३.७५ मि. ग्राम |
लोह |
००.४१ ग्राम |
‘क’ जीवनसत्त्व |
०२.४० मि. ग्राम |
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
टीप : रताळ्या प्रमाणे बटाटा वापरून पण या सारखी पोळी करता येते. कृती व साहित्य वरील प्रमाणे.
अंतिम सुधारित : 6/5/2020
सर्व अन्नघटक स्वतःच परिपूर्ण नसतात. पण दोन-तीन अन्...
उष्मांक (कार्यशक्ती) देणारे पदार्थ: कर्बोदके आणि स...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अन्न आणि पोषण बोर्ड निर्मित अर्भक बाळाला आहाराचे म...