हल्ली कीडनाशकांशिवाय शेती होणे अवघड आहे. यांत दोन प्रकारची औषधे असतात : बुरशीनाशक आणि कीटकनाशक. रासायनिकदृष्टया कीडनाशकांमध्ये पायरेथ्रम, पायरेथ्रिन, ऑरगॅनोक्लोरीन संयुगे, ऑरगॅनोफॉस्फरस संयुगे,कार्बामेट्स, पा-याची सेंद्रिय संयुगे, इ. प्रमुख आहेत. काही वनस्पतिजन्य कीडनाशकेही (उदा. कडूनिंबापासून तयार केलेली) आहेत. या सर्वांमध्ये ऑरगॅनोक्लोरीन आणि ऑरगॅनोफॉस्फरस संयुगे सर्वात घातक आहेत. या दोन्हींचा परिणाम जास्तकरून चेतासंस्थेवर होऊन मळमळ, डोकेदुखी, गोंधळलेपणा,त्त्वचेवर विचित्र संवेदना होणे, स्नायू थरथरणे किंवा उडणे आणि झटके यांपैकी लक्षणे दिसू शकतात. याचबरोबर ऑरगॅनोफॉस्फरस गटाच्या औषधांनी झांजावल्यासारखे होणे (डोके बधिरणे),डोळयांच्या बाहुल्या लहान होणे, बेशुध्दी, इ. परिणाम होऊ शकतात. हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले रुग्णही दगावू शकतात इतके हे विष तीव्र असते.
या विषारी पदार्थाचा उपसर्ग दोन प्रकारे होऊ शकतो
फवारताना होणारी विषबाधा बहुधा अगदी मंदगतीने होत असते. या विषांचा चेतासंस्थेवर परिणाम होऊन हळूहळू लकवा होतो (स्नायू निर्जीव होणे). फवारणी करताना नाका-तोंडास फडक्याची घडी बांधणे (किंवा श्वसनासाठी वेगळे उपकरण वापरणे), वा-याची दिशा पाहून फवारणी करणे, संरक्षक वेष घालणे, इ. काळजी घेणे आवश्यक आहे, पण हे फारसे केले जात नाही. उन्हाळ्यात किंवा उष्ण प्रदेशात हे सर्व उपाय क्वचितच वापरले जातात.
हा ढगाळ हवामानात शेतावर असणा-या एका बुरशीचा श्वसनसंस्थेत प्रवेश झाल्याने होणारा आजार आहे. यात मुख्यत: दीर्घकाळ कोरडा खोकला चालतो व तो इतर कोणत्याही औषधांना दाद देत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कुशल व्यवस्थापन, तरुण नेतृत्व, प्रभावी योजना यामधू...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...