कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात जर एकच किडणी असेल तर ती त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरते . या विषयाबद्दल लोकांच्या मनात उपस्थित झालेल्या शंकांचे निवारण करत त्यांचा या विषयांसंबंधीचा गैरसमज दूर करण्याचा आणि योग्य मार्गदर्शन देण्याचा हा प्रयन्त !
एकच किडणी असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात श्रम करण्यात कोणताही त्रास होत नाही. साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन किडन्या असतात,परंतु प्रत्येक किडनी इतकी कार्यक्षम असते कि ती एकटीच शरीराला आवश्यक असणारे काम पूर्ण करू शकते.
बहुतेकवेळा एक किडणी असणारी व्यक्ती आपले आयुष्य सर्वसामान्य जगते. तिच्या शरीरात एक किडणी असल्याचे बहुतेक वेळा अचानक केलेल्या तपासणीत लक्षात येते.
एकच किडणी असण्याचे कारणे पुढीलप्रमाणे?
१) जन्मजात शरीरात एकच किडणी असणे.
२) ऑपरेशनद्वारा शरीरातील एक किडणी काढून टाकलेली असने, किडणीत मुत्रखडा होणे, सूज येणे किंवा दीर्घकाळ मुत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्याकारणाने एका किडनीचे काम बंद होणे, तसेच किद्नीत कर्करोगाची गाठ असणे.
३) किडणी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णात नव्याने प्रत्यारोपित करण्यात आलेली एकच किडणी काम करत असते.
जन्मतःच शरीरात एकच किडणी असण्याची शक्यता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त असते आणि अशी शक्यता साधारणतः साडेसातशे व्यक्तींमध्ये एकात असते.
सर्वसाधाराणपणे एक किडणीवाल्या व्यक्तीला कुठलाही त्रास होत नाही. परंतु अशा व्यक्तींची तुलना राखीव चक नसलेल्या गाडींशी केली जाते.रोग्याच्या काम करणाऱ्या एकमेव किडनीला जर काही कारणाने नुकसान पोहोचले तर दुसरी किडणी नसल्यामुळे शरीराचे काम पूर्णपणे थांबते. जर हि एकच असलेली किडणी थोड्याच काळात पूर्ववत काम करू शकली नाही,तर शरीरावर याचे अनेक विपरीत परिणाम होतात:जे हळूहळू प्राणघातक ठरू शकतात. अशा व्यक्तीला त्वरित डायलिसीस करण्याची गरज पडू शकते.
१) जास्त प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे.
२) किडनीला धक्का लागण्याची शक्यता असलेले खेळ टाकावेत.
३) लघवीतील जंतूसंसर्ग आणि मुतखडा झाल्यास त्वरित योग्य उपचार करावेत.
४) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
५) वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन आपला रक्तदाब तपासावा व डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार रक्त व लघवीची तपासणी तसेच किडनीची सोनोग्राफी तपासणी करावी.
कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्याआधी किंवा शस्त्रक्रिया करण्यापुर्वी शरीरात एकच किडणी आहे, ह्याची माहिती डॉक्टरांना द्यावी
स्रोत - Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 11/13/2019
औषधांमुळे निर्माण होणारया किडनीच्या समस्या
पदार्थाचे रूप, आकार व रंग यांचे ज्ञान दृष्टीमुळे ह...
कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी ...
क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचारांचे तीन प्रकार आह...