औषधे घेतल्यामुळे किडनीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असण्याची दोन कारणे आहे:
१) किडनी बहुतेक औषधे शरीराच्या बाहेर टाकते. या प्रक्रियेत अनेक औषधे व त्यातून निर्माण होणाऱ्या पदार्थामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते.
२) ह्दयातून दर मिनिटाला निघणाऱ्या रक्तापैकी १/५ भाग किद्नीत जातो.शरीराची ठेवण आणि वजनानुसार पुर्ण शरीरातील सर्वात जास्त रक्त किद्नीत जाते. यामुळेच किडनीचे नुकसान करू शकणारी औषधे आणि इतर पदार्थ कमी वेळात आणि अधिक प्रमाणात किद्नीत पोहचतात,ज्यामुळे किडनीचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.
शरीर आणि सांध्यात होणाऱ्या कमी-अधिक वेदनांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेणे सध्या सर्रास केले जाते.किडनी खराब होण्याच्या प्रकारासाठी हि वेदनाशामक औषधे मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात.
वेदना कमी करण्यासाठी आणि ताप उतरवण्यासाठी वापरात येणाऱ्या औषधांना वेदनाशामक (Nonsteroidal anti-inflammatory drugs-NSAID’s) औषधे म्हणतात.या प्रकारच्या औषधात मुख्यत्वेकरून पँरासीटेमॉल,अँस्पिरीन ,आइब्युमोफेन ,क्रिटोमूफेन,डायक्लोफेनाक सोडियम,निमेसुलाइड आदींचा समावेश होतो.
नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वसामान्य व्यक्तीने , योग्य प्रमाणात आणि योग्य काळ घेतलेल्या वेदनाशामक औषधांचा वापर पूर्णपणे सुरक्षित असतो.
अशा रोग्यांसाठी पँरासीटेमॉल हे औषध वापरणे अधिक सुरक्षित असत.
हदयाच्या त्रासासाठी अस्पेरीन नियमित पण अल्प प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे किडनीचे नुकसान होत नाही.
वेदनाशामक औषधे कमी वेळासाठी वापरली जाण्याने , अचानक खराब किडनी योग्य उपचार आणि वेदनाशामक औषधे बंद केल्याने पुन्हा ठीक होऊ शकते.
प्रौढ व्यक्तींना सांधेदुखीकरिता वेदनाशामक औषधे दीर्घकाळ आणि नियमितपणे घ्यावी लागतात. अशा रुग्णांमध्ये किडनी हळूहळू खराब होऊ लागते. अशी किडणी पुन्हा ठीक होऊ शकत नाही. अशा रुग्णांनी किडनी सुरक्षित राहावी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घ्यावीत.
1) लघवीतून प्रथिने जात असतील तर हा किडनीवरील दुष्परिणामांचा सर्वप्रथम दिसून येणारा आणि एकमेव पुरावा असू शकतो.किडणी अधिक खराब झाली असेल तर रक्ताच्या तपासणीत क्रिअँटीनीनचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
2) अँमायनोग्लायकोसाइड्स
जेन्टामायसीन नावाचे इंजेक्शन जर दीर्घकाळ आणि मोठ्या प्रमाणात घ्यावे लागले अथवा,प्रौढ वयात किडणी कमजोर असेल आणि शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल,तर अशा रुग्णांमध्ये वरील इंजेक्शन घेतल्याने किडणी खराब होण्याची शक्यता अधिक असते. जर हे इंजेक्शनत्वरित बंद केले गेले तर बहुतेक रुग्णांमध्ये थोड्याच काळानंतर किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते.
3) रेडीओकॉट्रास्ट इंजेक्शन
प्रौढ वय,किडणी फेल्युअर,मधुमेह,शरीरात पाण्याचे कमी प्रमाण,अथवा याचबरोबर किडनीचे नुकसान करू शकणारी अन्य औषधे घेतली जात असतील, तर अशा रोग्यांमध्ये आयोडीनयुक्त इंजेक्शन देऊन एकस-रे तपासणी केल्यास, किडणी खराब होण्याची शक्यता जास्त असते. बहुसंख्य रोग्यांच्या किडनीचे झालेले नुकसान हळूहळू ठीक होऊ शकते.
4) आयुर्वेदिक औषधे
आयुर्वेदिक औषधांचा कधी काहीही विपरीत परिणाम होत नाही, हा गैरसमज आहे, आयुर्वेदिक औषधांचा उपयोगात आणलेल्या शिसे,पार यासारख्या धातूंमुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी विविध प्रकारची आयुर्वेदिक औषधे अनेक वेळा धोकादायक ठरू शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये असलेले पोटँशियम अधिक प्रमाण किडणी फेल्युअरच्या रोग्यांसाठी जीवघेणे ठरू शकते.
5) अन्य औषधे
कित्येकदा किडनीला हानिकारक ठरणाऱ्या अन्य औषधांमध्ये काही विशिष्ट अँटीबायोटिक्स आणि कर्करोग तसेच क्षयरोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचाहि समावेश आहे
स्त्रोत - Kidney Education Foundation
अंतिम सुधारित : 1/20/2020
कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी ...
वेदनाशामके : वेदना कमी करण्यासाठी सामान्यपणे वापरल...
कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात जर एकच किडणी असेल तर ...
क्रॉनिक किडणी फेल्युअरवरील उपचारांचे तीन प्रकार आह...