অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

त्वचेचे प्रकार


स्वतःच्या त्वचेच्या प्रकाराची माहिती असणे म्हणजेच आपली त्वचा कशी जाणवते, कशी दिसते हे जाणणे होय. बऱ्याच वेळा अनेकजण आपल्या त्वचेची गटवारी करताना गोंधळून जातात. आपली त्वचा नेमकी कुठल्या प्रकारातली आहे  हे अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतात. पण त्वचेचे नेमके प्रकार किती आहेत याची माहिती असणे त्यासाठी गरजेचे आहे. आपली त्वचा वेगवेगळ्या प्रकारातली असू शकते. ज्या समस्या आहेत त्यांचे निदान करता येते. आपल्या त्वचेच्या गुणवत्तेनुसार पुरुषांची त्वचा महिलांच्या तुलनेत २०% जास्त जड असते. पुरुषांची त्वचा जास्त तेलकटही असते, तसेच रक्त पुरवठा जास्त प्रमाणात असतो. पुरुषांच्या त्वचेत घाम उत्सर्जित करण्याची प्रवृत्तीही महिलांपेक्षा अधिक प्रमाणात असते.

त्वचेचे मूलतः पाच प्रकार असतात.

१. सर्वसामान्य त्वचा

२. शुष्क (कोरडी) त्वचा

३. तेलकट त्वचा

४. संयोजित त्वचा

५. संवेदनशील त्वचा

१. सर्वसामान्य त्वचा – सर्वसामान्य त्वचेचा पृष्ठभाग हा मऊ, गुळगुळीत असतो. या प्रकारच्या त्वचेत तेल आर्द्रतेचा समतोल अचूक असतो. यामुळेच अशी त्वचा जास्त आर्द्र किंवा जास्त शुष्कही नसते.

त्वचेचे रक्षण करणारी छिद्रे लहान असतात व पूर्णतः त्वचेचा वर्ण एकसारखाच असतो. सर्वसामान्य त्वचा स्वच्छ, साफ असते व त्यावर डाग वाढत नाही. त्वचेवरील छिद्रे बारीक व सर्व जागी समान असतात. हे चांगले आरोग्य असल्याचे व साधारण उपचारांची गरज असल्याचे दर्शवते.

२. शुष्क (कोरडी) त्वचा – शुष्क (कोरडी) त्वचा ही पूर्णतः सुकलेली असते व त्या त्वचेची पातळ थर निघण्याची प्रवृत्ती अधिक असते. या त्वचेमध्ये आर्द्रता कायम ठेवणारे ग्रंथी यासाठी असमर्थ असल्यामुळे ती अशाप्रकारे कोरडी होत जाते. अहि त्वचा असलेल्या व्यक्तींना हिवाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवतात. तसेच त्यांची त्वचा तेलकट आणि सर्वसामान्य त्वचा असलेल्या व्यक्तींपेक्षा लवकर वृद्ध होत असते. नित्यनेमाने संरक्षण अपरिहार्य व महत्त्वाचे असते.

३. तेलकट त्वचा – नावाप्रमाणेच ही त्वचा तेलकट व गुळगुळीत असते. याप्रकारच्या त्वचेच्या अशा अस्तित्वाचे कारण त्वचेचा पृष्ठभाग तेलयुक्त बनवणारे स्त्राव संपुष्टात येणे हे आहे. त्वचेचा पृष्ठभाग जास्त तेलयुक्त असल्याने त्यावर वातावरणातील धुळ व माती जास्त प्रमाणात त्वचेवर चिकटते. याप्रकारच्या त्वचेचे आवरण काळसर, पांढरट, डाग किंवा पुटकुळ्या असलेले असू शकते. अशी त्वचा साफ व स्वच्छ राहू शकत नाहीत. अशा त्वचेला वारंवार स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता असते.

४. संयोजित त्वचा – संयोजित त्वचा ही अगदी सामान्य असते. नावाप्रमाणेच अशा त्वचेमध्ये तेलकट व कोरडेपणा हे दोन्ही प्रकार दिसून येतात. चेहरा व त्या जवळील भाग तेलकट असतो तर शरीराचा इतर भाग मात्र शुष्क म्हणजेच कोरडा असतो. सर्वसाधारणतः कपाळ, नाक आणि हनुवटी कडील भाग चमकदार असतो तर गाळ व त्याजवळील भाग आणि तोंडाकडील भाग कोरडया स्वरूपाचा असतो. हा चमकदार मध्यभाग टी झोन या नावाने ओळखला जातो. चेहरा व त्याजवळील भागावर त्या त्वचेच्या प्रकारानुसार त्या त्वचेवर उपचार केले पाहिजेत.

५. संवेदनशील त्वचा – संवेदनशील त्वचा ही अतिशय संवेदनशील असते व बदलत्या वातावरणाचा लगेचच तिच्यावर प्रभाव पडत जातो. त्वचेच्या या प्रकारानुसार साबण, सुवासिक अत्तरे, ब्लिचिंग, वाक्सिंग, दाढीचा साबण इत्यादी पासून त्वचेला नुकसान होऊ शकते. तसेच गरज नसतानाही त्वचेची रासायनिक उत्पादने वापरल्यानेही त्वचेला अपय होऊ शकतो.

स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate