प्रस्तावना
नाकाच्या आतील बाजूस असलेल्या त्वचेला सायनस असे म्हणतात किंवा सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.
कारणे
नाकातील व तोंडातील लाळ ग्रंथींनी सायनस वेढलेले असते. जेव्हा माणसाला सर्दी किंवा संक्रमण (इन्फेक्शन) होते तेव्हा सायनसच्या भागातून शेंबुड जास्त प्रमाणात वाहू लागतो व सायनसला सुज येते. सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागतो. अशा वेळी जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात व सायनसायटिस होतो.
लक्षणे
सायनसायटीस मुळे वेगवेगळ्या वयाच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतात.
- मुलांमध्ये साधारण सर्दी पहायला मिळते, ज्यात नाक वाहणे किंवा सुजणे आणि किंचित ताप ही लक्षणे दिसून येतात. बाळाला सर्दीनंतर ३-४ दिवसांनी ताप येतो तेव्हा सायनसायटीसची लक्षणे सुरु होतात, किंवा काही इतर रोगांची लक्षणे जसे ब्रॉन्कॉयटीस्, न्यूमोनिया किंवा कानाचे संक्रमण असु शकते.
- मोठ्यांमध्ये, सायनसायटीसची सामान्य लक्षणे म्हणजे दिवसाचा कोरडा खोकला जो आठवडाभरात देखील कमी होत नाही व ताप, दात दुखणे, कान दुखणे किंवा जबड्याची हाडे दुखणे ही लक्षणे वाढत जातात. इतर काही लक्षणे जसे पोट खराब होणे, मळमळ, डोकेदुखी आणि डोळ्यांच्यामागे दुखणे, इत्यादी दिसायला लागतात.
काही सामान्य उपाय
- सायनसायटीस हा सामान्य असून त्यावर सोप्या रितीने उपचार करता येतो. जेव्हा मुलाला ७ दिवसापेक्षा जास्त दिवस सर्दी असेल व तिचे १० दिवसांनी तापात रुपांतर झाले तर त्वरित वैद्यकिय आधिका-याला दाखवावे वा दवाखान्यात न्यावे.
- तुमच्या घराच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवा आणि सायनसायटीस होईल अशा प्रकारची परिस्थिती किंवा संक्रमण टाळा.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम अंतिम सुधारित : 6/2/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.