অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कानांची व नाकाची निगा

कानांची व नाकाची निगा

कानांची निगा

  • रोजच्या रोज आंघोळीच्या वेळी ओल्या फडक्याने कण स्वच्छ पुसून घ्यावेत.
  • नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कानातील मळ साफ करताना औषध टाकून मग तो काढावा म्हणजे तो फुगून लवकर बाहेर येतो.
  • कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. चुकून काडीचा धक्का लागला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते किंवा कानाचा पडदा फाटूही शकतो.
  • थंडीच्या दिवसांमध्ये कान शक्यतो झाकलेले असावेत. शक्यतो लहान बाळांचे व मुलांचे तर जास्त काळजी घ्यावी.

नाकाची निगा

  • नाकाची निगा राखताना नाक नियमितपणे शिंकरावे, साफ करावे.
  • नाक पाण्याने स्वच्छ करावे.
  • नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.
  • काही व्यक्तींना सतत नाकात बोट घालण्याची सवय असते. त्यामधून नाकाचा नाजूक अंर्तत्वचेला इजा होण्याची शक्यता असते. व त्यामधून बऱ्याचवेळा नाकातून रक्त पडते.नाकातून रक्त पडत असल्यास-

१. नाकातून रक्त पडणाऱ्या व्यक्तीला मांडी घालून बसवावे.

२. सुती रुमाल गार पाण्याने ओळ करून नाकावर धरावा.

३. टाळूवर गार पाणी शिंपडावे.

४. गार पाणी प्यावयास दयावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate