या योजनेचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रे व शहरातले सरकारी दवाखाने यांच्यामार्फत चालते.
1. जास्तीत जास्त कुष्ठरोगी शोधून उपचार करणे. यातून एकूण जंतुभार कमी करून संसर्गाचे प्रमाण कमी करणे.
2. समाजातील कुष्ठरोगाचे एकूण प्रमाण दहा हजारी 1 पेक्षा कमी करणे.
3. अंतिम उद्दिष्ट भारताला कुष्ठरोगमुक्त करणे.
या उद्देशाने कुष्ठरोग नियंत्रण योजना आता कुष्ठरोग निर्मूलन योजना झालेली आहे.
मुख्य म्हणजे कुष्ठरोगाची लक्षणे लवकरात लवकर शोधून, त्यावर त्वरित उपचार करणे. यामुळे विकृती निर्माण व्हायच्या आतच रोग बरा होऊ शकेल. याबद्दल समाजाला,कुटुंबांना योग्य माहिती देणे हाच मार्ग आहे.
आता महाराष्ट्रात दर दहा हजारात सुमारे 3 कुष्ठरुग्ण आहेत. योग्य प्रयत्नांनी हे प्रमाण2012 पर्यंत आपल्याला दहा हजारात केवळ अर्धा इतके कमी करायचे आहे. (म्हणजे20000 लोकसंख्येस 1 कुष्ठरुग्ण). सध्या 34 पैकी 29 जिल्ह्यात हे प्रमाण एकपेक्षा कमी झालेले आहे.
यासाठी विशेष जिल्हे/भाग सोडल्यास कुष्ठरोगाची शोधमोहिम थांबवण्यात आली आहे. पूर्वी कुष्ठरोग सेवा केवळ कुष्ठरोग तंत्रज्ञ देत. आता कुष्ठरोग सेवा सर्वच आरोग्य सेवकांकडेच सोपवली आहे. या सेवा सर्व शासकीय आरोग्यकेंद्रांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये मिळू लागल्या आहेत. लोकांनी स्वत:हून रोगनिदानासाठी पुढे यावे यासाठी आरोग्य शिक्षण हाच महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, पालिका दवाखाने/रुग्णालयांमध्ये रोगनिदान व उपचाराची सोय केली आहे.
आता रुग्ण निदानासाठी आला की केवळ शारीरिक तपासणी होते. पूर्वीप्रमाणे प्रत्येकाचा त्वचेचा नमुना तपासणीसाठी घेतला जात नाही. रोगनिदान केवळ चट्टा,बधिरता, अवयव आखडणे यावरून केली जाते.
रोगनिदानानंतर रुग्णास ओळखपत्र दिले जाते. बहुविध उपचार सुरु करून पाठपुरावा केला जातो. यानंतर ठरावीक काळाने पुनर्तपासणी केली जाते.
बहुविध उपचाराने रुग्ण लवकर बरे होतात. आता महाराष्ट्रात नागपूर विभाग सोडता सर्वत्र कुष्ठरुग्णांचे प्रमाण दर दहा हजारात एकपेक्षा कमी झाले आहे. नागपूर विभागात मात्र ते दीड इतके आहे.
कुष्ठरोग नियंत्रण योजना : आधुनिक बहुऔषधी उपचारपद्धती (तक्ता (Table) पहा)
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/28/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...