অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागरी हिवताप योजना

ऐतिहासिक पार्श्वभुमी

ग्रामीण तसेच शहरी भागात हिवतापाचे नियंत्रण करणे हे राष्‍ट्रीय किटकजन्‍यरोग नियंत्रण कार्यक्रमांचे उदिष्‍ट आहे. याकरीता शहरी व ग्रामीण भागात हिवताप नियंत्रणाचे काम सर्वसमावेशक पध्दतीने चालविण्यासाठी या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमातंर्गत शहरी भागात अळीनाशक फवारणी, हिवताप रुग्‍ण शोधून त्‍यांना समूळ उपचार करणे. यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्‍याचे ठरविण्‍यात आले. १९७१ मध्‍ये नागरी हिवताप योजना सुरु करण्‍यात आली व त्‍यात १३१ शहरांचा समावेश करण्‍यात आला. सद्यस्थितीत नागरी हिवताप योजना १९ राज्‍य व केंद्रशासित प्रदेशातील १३१ शहरातील १३०.३ लाख लोकसंख्‍या संरक्षित करीत आहे.

महाराष्‍ट्रात २.५ कोटी शहरी लोकसंख्‍या नागरी हिवताप व किटकामार्फत पसरणा-या आजारासाठी संरक्षित केली गेली आहे. यामध्‍ये एकूण १५ शहरांचा (मुंबई, पुणे, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, जळगाव, भुसावळ, नाशिक, नगर, मनमाड, सोलापूर, पंढरपूर, अकोला ) समावेश आहे.

उद्दिष्ट

नागरी हिवताप योजनेची मूळ उदिष्‍ट शक्‍य त्‍या सर्व उपाययोजना अंमलात आणून किटकजन्‍य आजाराचा प्रादुर्भाव कमी करुन प्रसार रोखणे हा आहे.

नागरी हिवताप योजनेची उदिष्ट्ये

  1. हिवतापाने होणारे मृत्‍यू टाळणे/ रोखणे.
  2. हिवतापाचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करणे.

धोरण

नागरी हिवताप योजनेतंर्गत धोरणाचे दोन प्रमुख भाग पुढील प्रमाणे आहेत -

१) परजीवी नियंत्रण २) किटकनियंत्रण
  1. परजीवी नियंत्रण :- रुग्णायलये, दवाखाने (खाजगी व सरकारी ) यांच्या मार्फत हिवताप रुग्णांगना समूळ उपचार करणे तसेच मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका, रेल्‍वे, सैन्यदल या संस्थांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने मलेरिया क्लिनिकची स्थापना करणे.
  2. किटक नियंञणः- किटकनियंत्रणात खालील बाबीचा समावेश होतो.
    • डासांची उत्पती रोखणे.
    • अळीनाशकाचा वापर करणे.
    • अळीभक्षक गप्पीीमासे व वापर करणे.
    • किटकनाशक फवारणी.
    • किरकोळ अभियांत्रिकीव्दाारे डासोत्पंत्तीी कमी करणे.

किटक नियंञणासाठी कायदेशीर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे

  • नागरी हिवताप योजनेत हिवताप नियंत्रणासाठी नागरी कायद्याचा (Urban by laws.) चा वापर करुन घरगुती, सरकारी, व्‍यापारी, इमारती इत्‍यादी ठिकाणी होणा-या डासोत्पत्तीवर नियंत्रण ठेवणे.
  • नाले, तळी, तलाव, इत्‍यादी ठिकाणी अळीनाशकाचा वापर करणे.
  • गप्‍पीमासे सोडणे शक्‍य नसलेल्‍या डासोत्‍पत्‍ती स्‍थानांत अळीनाशकाचा वापर करणे.

उपाययोजना

नागरी हिवताप नियंत्रण योजनेत खालील उपाययोजना समावेश होतो.

  • डासांची उत्पती रोखणे, कमी करणे, डासोत्‍पत्‍ती स्‍थाने कमी करण्‍यासाठी,साचलेले पाणी, किरकोळ अभियांत्रिकीव्दाजरे वाहते करणे,खडडे बुजविणे, तुंबलेली गटारे वाहती करणे, सांडपाण्‍याची योग्‍य प्रकारे विल्‍हेवाट लावणे, घरातील पाण्‍याची भांडी आठवडयातून एकदा घासून पूसून कोरडी करणे, कोरडा दिवस पाळणे इत्‍यादी बाबी करण्‍यात येतात.
  • अळीनाशक पध्‍दतीः-
    1. रासायनिक- डासांची पैदास कमी करण्‍यासाठी योग्‍य ते अळीनाशक डासोत्‍पत्‍ती स्‍थानांवर फवारणे.
    2. धूरफवारणी – दुषित डास मारण्यासाठी पायरेथ्रम एक्‍सट्रॅक्‍ट २ टक्‍के वापरुन हिवताप, डेंग्‍यू रुग्‍णांचे घराभोवतालच्‍या ५० घरात धूरफवारणी करणे.

बिगर सरकारी संस्‍थाचा सहभाग

  • लोकप्रबोधन करणे.
  • गप्‍पीमासे वापर करण्‍यासाठी प्रबोधन करणे.
  • आरोग्‍य शिबिरांचे आयोजन करणे.

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate