অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नवजात आणि लहान मुलांची अन्नाची गरज

प्रस्तावना

आयुष्याची पहिले काही वर्षे शरीर वेगाने वाढते. बाळाचे जन्माच्या वेळेचे अंदाजे ३ किलो वजन सहा महिन्यात दुप्पट होते. एक वर्ष होता त्याचे वजन ०९ किलो पर्यंत होते. नवजात आणि लहान मुले फार चळवळी असतात आणि जास्त प्रमाणात आपली ऊर्जा खर्च करतात. म्हणूनच त्यांना जास्त प्रमाणात शरीर सुदृढ करणारे आणि ऊर्जा देणारे प्रथिन आणि कॅलरीज असलेले अन्नपदार्थ आवश्यक असताता.

नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन आणि देशातील इतर संशोधन केन्द्रांमध्ये नवजात आणि वाढत्या वयाच्या लहान मुलांना पोषक तत्वाची गरज यावर भरपूर अभ्यास केले गेले आहेत. या अभ्यासांच्या आधारावर, प्रथिन आणि कॅलरीजचे ग्रहण खालील प्रमाणे संतुती केली आहे.

क्र.

वयोगट

शरीराचे अपेक्षित वजन (अंदाजे) किलो

कॅलरीज
Kcals.

प्रथिन
ग्राम

1.

जन्मापासून सहा महिन्या पर्यंत

३-७

६००

११

2.

सहा महिन्यापसून एक वर्ष

७-९

८००

१३

3.

१-३ वर्ष

९-१३

१२००

१८

4.

४-६ वर्ष

१५-१७

१५००

२२

5.

७-९ वर्ष

१८-२१

१८००

३३

6.

१०-१२ वर्ष

२३-२८

२१००

४१

नवजात शिशु

आयुष्याच्या पहिल्या चार ते सहा महिन्यां पर्यंत, स्तनपान सामान्यतः बाळाला आवश्यकतेनुसार पोषक तत्व पुरवते. या वेळेत बाळ आपल्या आईच्या दुधावरच अवलंबून चांगले वाढते.
स्तनपान हे बाळाला सहा महिन्या नंतर ही मिळत असेल. पण हे वाढत्या बाळाच्या वाढत्या पोषक तत्वाच्या गरजानुसार पुरेसे नसते. या वेळी पोषक तत्वाच्या कमतरतेपेक्षा जास्त आहार असणे आवश्यक असते.
पण, आईच्या दुधाच्या कमतरतेला भरून काढण्यासाठी कोणते अतिरिक्त आहार बाळाला दिले पाहिजे ? पुढच्या पानांमध्ये, ही कमतरता पूर्ती करण्यास काही पाककृती सुचवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. हे सुचवण्यास, खालील मुद्दे मनात ठेवले गेले आहेत

1.पाककृती हे स्थानिक बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्यांवर अवलंबून असायला पाहिजेत.

2.स्व्यंपाकाची पद्धत साधी असायला पाहिजे.

3.खर्च कमीत कमी असायला पाहिजे

4.पाककृती आई आणि बाळाला चवीला, समंजस्तता आणि मापात योग्य असली पाहिजे.

5.सुचवलेल्या पाककृतीने जे काही स्तनपान उपलब्ध असेल त्यासोबत बाळाच्या कॅलरीज, प्रथिन आणि इतर पोषक तत्वाच्या गरजा पूर्ण करायला पाहिजे.

शाळेला जाण्या आधीचे लहान मूल

बहुदा, मूल जेव्हा एक ते दीड वर्षाचा होतो, त्याला स्तनपान उपलब्ध नसेल. म्हणूनच, अशा मुलाला पूर्णपणे बाहेरच्या आहारावर अवलंबून असायला पाहिजे. आत्ता पर्यंत, मुलाला दात आलेले असतील आणि आपोआप खायला शिकले असेल, आणि त्याला मोठ्यांचे जेवण उपलब्ध असेल. पण हे अन्नपदार्थ जास्त करून भात, गहू आणि इतर सर्व साधारण धान्यांवर आधारित असतात. हे या आहारात तुलनात्मक रूपाने प्रथिनची कमी असते आणि फार कमी प्रमाणात हे आहात मुलांना दिले जाते. खरे तर हा असा वेळ आहे जेव्हा मुलाला जास्त पोषक आहाराची गरज असते ज्याने प्रथिन आणि कॅलरीज मिळतील. जर हे उपलब्ध केले गेले नाही, तर त्याचे दुश्परिणाम फक्त लगेचच नाही तर आयुष्‍याचा नंतरच्या काळात सुद्धा दिसून येते. नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन मध्ये केलेल्या एका साध्या प्रयोगाने हे सिद्ध होऊ शकते.
एका उंदरिणीला झालेल्या पिल्लांचे दोन गट करून त्यांना दोन वेगळ्या प्रकारचे आहार दिले गेले. आईचे दूध सोडवायच्या वेळे नंतर (पोस्ट वीनिंग – आईचे दूध पूर्णपणे सोडवल्या लगेच) एका गटाला पोषक आहार दिले गेले आणि दुस-या गटाला अशा पोषक आहारापसून वंचित ठेवले गेले होते. फक्त चार आठवडे वंचित ठेवल्या नंतर, दुस-या गटाला परत पुरेसे पोषक आहार दिले गेले. दीड ते दोन वर्ष पोषक आहार दिल्या नंतर सुद्धा, अत्यंत महत्त्वपूर्ण वेळेत (आईचे दूध सोडवल्यानंतर लगेच) पोषक आहार न दिल्या मुळे या गटाचे लहान उंदीर पहिल्या गटाच्या उंद्रांच्या वाढत्या वेगाबरोबर राहू शकले नाही. मानवी आयुष्यात ही अत्यंत महत्त्वपूर्ण वेळ आहे जेव्हा पुरेशा प्रमाणात पोषक आहार देण्याची गरज आहे, वयाच्या ३- ४ वर्षाच्या वयोगटाला अनुरूप आहे.
म्हणूनच, आईचे दूध पूर्णपणे सोडवल्या लगेचच्या काळात, मुलाला व्यवस्थित पोषक आहार देण्या विषयावर काळजी घेणे आवश्यक आहे ज्याने हे निश्चित करू शकतो की फक्त त्या वेलेत नाही तर आयुष्‍याचा नंतरच्या काळात सुद्धा सामान्य विकास होऊ शकतो. नुकत्याच केलेल्या प्रयोगाने हे सिद्ध कले गेले आहे की आयष्‍याच्या सुरुवातीच्या वेळेत झालेले कुपोषण फक्त शारीरिक विकासात नाही तर सामान्य मानसिक विकासात सुद्धा हस्तक्षेप करू शकते. याने हे प्रामुख्याने सिद्ध होते की शाळेला जाण्या आधीच्या लहान मुलांना वयाच्या एक वर्षानंतर पोषक आहार देण्याची फार गरज आहे.

काही पाककृती जे शाळेला जाण्या आधीच्या लहान मुलांना खाऊ घालू शकतो ( वयाच्या एक ते पाच वर्षाच्या वयोगटात) पुढच्या पानंवर दिले गेले आहेत. ही पाककृती तयार करण्यात जे सामान्य स्तर वापरले गेले आहेत ते नवजात शिशुला दिले जाणा-या पाककृतींसारखे आहेत.

शाळेला जाणारे मूल

लहान मुलं शाळेत जाताना सुद्धा वाढत असतात, पण जरा कमी वेगाने. आयुष्याच्या या वेळेत सुद्धा पुरेसा आहार देणे गरजेचे आहे.

मूल आत्ता पर्यंत आपल्या कुटुंबाच्या आहाराच्या सवयी शिकलेले असेल आणि आपल्या घरात केले जाणारे पदार्थाला परिचित झाले असेल. घरचे आहार बहुदा शाळेत जाणा-या मुलांना पोषक तत्वामध्ये पुरेसे नसते. ही कमतरता भरून काढण्यास या मुलांना अतिरिक्त आहार ज्यामध्ये प्रथिन आणि शरीर सुदृढ करणारी तत्व असतील. याने शाळेत जाणारी लहान मुलांची वाढ आपण निश्चित करू शकतो.

शाळेत दिले जाणारे दुपारच्या जेवणाचे कार्यक्रमात अशा मुलांना आपण एक पोषक अतिरिक्त आहार देण्यास एक संधी मिळते. नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन ने केलेल्या एका कार्यक्षेत्रीय अभ्यासात हे दिसले गेले आहे की काही ठिकाणी जेथे हे दुपारच्या जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहे, तिथे अशा मुलांचे घरी खाणारे आहाराची परिमाण कमी झाले आहे. याने शाळेत दिले जाणारे दुपारच्या जेवणाचे प्रयोजन असफल होते. म्हणून, आई- वडिलांना हे समजवण्याचे गरजेचे आहे की शाळेत दिले जाणारे दुपारच्या जेवण हे अतिरिक्त आहे आणि घरच्या जेवणा ऐवजी नाही.

काही पाककृती जे शाळेला जाणा-या मुलांना अतिरिक्त आहार म्हणून खाऊ घालू शकतो, हे “कमी किमतीच्या संतुलित आहाराची पाककृती आणि शाळेत दिले जाणारे दुपारच्या जेवणाचे कार्यक्रम” नावाच्या पुस्तिकेत दिले गेले आहे जे ह्या संस्थेने जारी केले आहे.

पाककृती तयार करण्यामागचे प्रमुख निकष

आधी सांगितल्या प्रमाणे, एका सहा महिने ते एक वर्षाच्या नवजात शिशुला रोज १३ ग्राम प्रथिन आणि ८०० कॅलरीज ची आवश्यकता असते. या वेळच्या स्तनपानाने अंदाजे ५ ग्राम प्रथिन आणि ३०० कॅलरीज उपलब्ध होते. नवजात शिशुला आईचे दूध सोढवतानाच्या आहाराची पाककृती अशा रीतीने योजले आहेत की बाकीची आवश्यकता पूर्ण केले जाईल.

तसेच, शाळेला जाण्या आधीचे लहान मुलांना वयाप्रमाणे, रोज २० ग्राम प्रथिन आणि ८००- १५०० कॅलरीजची गरज असते. जे अतिरिक्त आहार जे इथे सुचवले गेले आहेत, त्याने अपेक्षित आहे की रोजच्या आवश्यकतेच्या अर्धे प्रमाण प्रथिन आणि १/३ प्रमाण कॅलरीजची गरज पूर्ण केले जातील.

अधिक आवश्यक प्रथिन सर्वसाधारण जास्त प्रमाणात असलेल्या प्रथिन खाद्य उदा. दूध, मांस, मासे आणि अंडी किंवा कडधान्य आणि दुसरे स्वस्त खाद्य पदार्थांपासून उपलब्ध होऊ शकतो. या पुस्तिकेचा हेतू आहे की अतिरिक्त आहार कमीत कमी किमतीत कसे पुरवले जाऊ शकते, महाग पदार्थ उदा. मांस, मासे, अंडी आणि दूध यांपासून तयार केले जाणारे पाककृती सांगितले गेलेले नाहीत. अधिक प्रमाणात आवश्यक असलेले पोषक तत्त्व सर्व साधारण पणे उपलब्ध असणारे धान्य, कडधान्य, बादाम आदि आणि तेलबिया जे आपल्या देशात प्रथिन आणि कॅलरीजचे फार स्वस्त साधन आहेत, यांपासून पूर्ति करून देण्याचे विचार आहे.

भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इ. हे साधारणतः आपल्या देशाच्या विविध भागात वापरले जाणारे धान्य आणि दुय्यम तृणधान्य आहेत. १०० ग्राम धान्यांमध्ये सामान्यतः ३५० कॅलरीज असतात. पण त्यात तुलनात्मक रुपेने प्रथिनचे प्रमाण फार कमी आहे. साधारणपणे ७७% भाता मध्ये आणि १२% गहू मध्ये. ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांचे प्रथिनचे प्रमाण याम्ध्ये पडतात. कडधान्य हे प्रथिनचा नैसर्गिक सुपीक स्त्रोत आहे. यांमध्ये २२- २५% प्रथिन असतात आणि धान्यांसारखे १०० ग्राम पासून ३५० कॅलरीज उपलब्ध करतात. साधारणपणे वापरले जाणारे कडधान्य आहेत, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, इ.

तेलबियांचे दुप्प्ट फायदे आहेत. ते प्रथिनचे एक फार सुपीक स्त्रोत आहे आणि तेल असल्यामुळे कॅलरीजचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. सर्व साधारण तेलबिया उदा. शेंगदाणे, तीळ आणि सरकी यांचे तेल काढल्या नंतर जे पीठ राहते हे प्रथिनचे एक फार चांगले स्त्रोत आहेत, जवळपास ५०%. म्हणून मानवी आहारात नुकतेच या पिठाचे सेवन करण्यास सल्ला दिला गेला आहे. पण, तेलबियांचे पीठ जे देशी घाणी आणि तेलच्या मिला मध्ये मिळते, त्यात बहुदा धूळ आणि इतर नको असणारे पदार्थ असतात आणि म्हणून ते मानवी सेवनसाठी उपयुक्त नाही. नुकत्याच तेलबियांच्या तंत्रविद्या मध्ये झालेल्या प्रगतिमुळे, असे पद्धती उपलब्ध करून दिले आहेत जेणे करून हे तेलबियांचे पीठ मानवी सेवनसाठी उपयुक्त असेल. आणि हे तेलबियांचे पीठ मानवी आहारात प्रथिनचे एक मूल्यवान स्त्रोत म्हणून वापरले जाऊ शकते.

वाढत्या मुलाला प्रथिन आणि कॅलरीजच्या व्यतिरिक्त दुसरे पोषक तत्त्व उदा. कॅल्शियम आणि जीवनसत्व अ ची आवश्यकता असते. पाले भाजी आणि मलई काढलेले दूध पावडरचे योग्य वापराने या गरजा पूर्ण करू शकतो, म्हणूनच हे पदार्थ तयार मिळणा-या दूध फॅरम्यूला मध्ये वापरले जातात. आपल्या देशात मलई काढलेले दुधाची कमतरता आहे, पाककृती ज्या मध्ये मलई काढलेले दुधाचे वापर केले जात नाही हे सुचवले गेले आहेत.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate