অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

होमिओपॅथी

होमिओपॅथीचा परिचय

आज होमिओपॅथी वेगाने वाढणारी आणि जगात सर्वत्र वापरली जाणारी संस्था आहे. हळुवारपणे होणा-या त्याच्या इलाजामुळे आणि सुरक्षित गोळ्यांमुळे होमिओपॅथीचा वापर भारतात घरोघरी दिसतो. साधारण अभ्यासाने असे लक्षात येते की भारतीय लोकसंख्येपैकी 10% लोक आपल्या आरोग्यासाठी पूर्णपणे होमिओपॅथीवर अवलंबून आहेत आणि देशातील दुसरी अत्यंत लोकप्रिय औषध प्रणाली म्हणून याकडे पाहिले जाते.

आता आर्धा ते एक शतकापासून होमिओपॅथी भारतात वापरात आहे. ती देशाच्या मुळात आणि संकृतीत अशी मिसळून गेली आहे की ती आता एक राष्ट्रीय औषध संस्था म्हणून ओळखली जाते आणि मोठ्या संख्येने लोकांना आरोग्य देखभाल प्रदान करुन फार महत्वपूर्ण भूमिका बजावते. तिची ताकत तिच्या स्पष्ट प्रभावात दिसून येते कारण ती आजारी व्यक्तीबद्दल संवर्धनाच्या माध्यमातून समग्र दृष्टिकोण ठेवून त्याच्या मानसिक, भावनात्मक आध्यात्मिक आणि भौतिक स्तरावर आंतरिक संतुलन ठेवते.

‘होमिओपॅथी’ हा शब्द ग्रीक शब्दाच्या दोन शब्दांपासून बनलेला आहे, होमिओज् म्हणजे सारखा (सम), आणि पॅथोज् म्हणजे पीडित. सोप्या भाषेत होमिओपॅथी म्हणजे, अल्प मात्रेत निर्धारित उपायांनी रोगांवर उपचार, जी निरोगी व्यक्तिंने घेतल्यास रोगाची लक्षणे उत्पन्न करण्यास सक्षम आहे. चिकित्सेच्या सामान्य प्राकृतिक कायद्यावर ही आधारित आहे- "स्मिलिया सिमिलिबस क्युरान्तूर” म्हणजे "काट्याने काटा काढणे”. डॉ. सॅम्यूअल हॅनिमॅन (1755-1843) यांनी 19 व्या शतकाच्या सुरुवातीला याला एक वैज्ञानिक आधार दिला. दोन शतकांपूर्वीपासून ही पीडित मानवांची सेवा करीत आहे व दीर्घकाळाच्या कसोटीस उतरली आहे आणि कालांतरापासूनची चिकित्सा पाद्धती म्हणून उदयास आली आहे, वैज्ञानिक हॅनिमॅन ने मांडलेले सिद्धांत नैसर्गिक आणि ठोस आहेत आणि आज देखील यशस्वीपणे वापरात असल्याचे दिसते.

उपाय

“उपाय” हा होमिओपॅथीतील तांत्रिक शब्द असून त्याने रोग्यावरील उपचाराच्या प्रयोजनाने एका विशिष्ट पद्धतीने तयार केलेला पदार्थ दर्शवला जातो; ह्याचा अर्थ साधारण भाषेत वापरात असलेल्या शब्दाशी लावू नये, जो म्हणजे "औषध किंवा चिकित्सा ज्याने रोग बरे होतात किंवा दुःख कमी होते ".

होमिओपॅथीक चिकित्सक उपाय विहित करतांना दोन प्रकारच्या संदर्भांवर अवलंबून असतात : औषध विवरण (मटेरिया मेडिका) आणि प्रश्नावली (रिपोर्टरिज्). होमिओपॅथीत औषध विवरण म्हणजे ज्यात वेगवेगळ्या लक्षण स्वरुपांचे त्याच्या व्यक्तिगत उपायांसह "औषधांच्या चित्रांचा समूह", “उपायांसह”, वर्णमालेनुसार रचलेला असतो. होमिओपॅथीक रिपोर्टरिज् म्हणजे रोगांच्या लक्षणांची अनुक्रमणिका ज्यात विशिष्ट लक्षणांसकट उपायांची सूची दिलेली असते.

होमिओपॅथी मध्ये प्राणी, वनस्पती, खनिजे आणि कृत्रिम पदार्थ उपाय म्हणून वापरले जातात. उदाहरणार्थ अर्सेनिकम अल्बम (अर्सेनिक ऑक्साईड), नॅट्रम मूरियाटिकम (सोडियम क्लोराईड किंवा रोजच्या वापरातले मीठ), लॅचेसिस मुटा (बुशमास्टर जातीच्या सापाचे विष), ओपियम, आणि थायरॉयडिनम (थायरॉईड हार्मोन). होमिओपॅथ नोसोड नावाच्या चिकित्सेचा देखील उपयोग करतात (ग्रीक मध्ये नोसोस, म्हणजे रोग) रोग्यापासून उत्पादीत किंवा पॅथॉलॉजीकल पर्दाथ उदा. श्वसनातील कफ, मल, मूत्र, रक्त आणि उती या पासून तयार केलेले उत्पादन. स्वस्थ नमुन्यांपासून तयार होणा-या होमिओपॅथीक उपायांना सारकोडस् असे म्हणतात.

रचना

होमिओपॅथी उपायांमध्ये क्वार्ट्ज आणि आईस्टरच्या शिपल्यांसारख्या न विरघळणा-या पदार्थांना विरघळविण्यासाठी मोरटर आणि पेस्टलचा उपयोग केला जातो.

रोगांवर उपाय तयार करतांना, होमिओपॅथ डायनामायझेशन किंवा पोटेंटायझेशन सारख्या प्रक्रिया वापरतो ज्यात पदार्थ अल्कोहल किंवा डिस्टिल्ड वॉटरमध्ये पातळ केला जातो आणि मग दहा वेळा जोराने तो घुसळला जोतो, त्या प्रक्रियेला सक्कुशन म्हणतात. हॅनिमॅन यांच्या सल्ल्याने असे पदार्थ वापरण्यात आले ज्याने रोगावर इलाज केल्याची लक्षणे दिसून येतील, पण असे आढळले की त्या पदार्थांनी तीव्र लक्षणे दिसून न येता अवस्था अजून खराब होते, आणि कधीकधी घातक विषारी लक्षणे अढळून आली. म्हणून त्यांनी हे पदार्थ पातळ करून वापरावे असे सांगितले. हॅनिमॅन असे मानायचे की सक्कुशन मुळे पातळ पदार्थात महत्वपूर्ण उर्जा वाढते आणि ते जास्त मजबूत बनते. सक्कुशनला सोयीस्कर बनविण्यासाठी, हॅनिमॅन ह्यांनी घोड्याचे खोगीर बनवणार्‍या एका कारागिराकडून कातडीने एका बाजूने झाकलेला लाकडी बोर्ड बनवून घेतला जो उलट बाजूने घोड्याच्या केसांनी भरलेला होता. न विरघळणारे पदार्थ, उदा. दळलेले क्वार्टज् आणि ऑयस्टरच्या शिंपल्यांचा चुरा, हे लॅक्टोज मध्ये विरघळवले जातात.

घोळणे

होमिओपॅथीत सामान्यपणे तीन लघुगणकीय शक्ति स्तर वापरात आहेत. हॅनिमॅन यांनी सेंटेसिमल किंवा सी स्केल तयार केला, प्रत्येक टप्प्यात 100 च्या भाज्याद्वारे पदार्थाला पातळता देणे. हॅनिमॅनला जीवनाच्या जास्तीतजास्त कालात सेंटिसिमल मापन इष्ट वाटले. एका 2C घोळणात पदार्थाला शंभरात एक भाग असे पातळ करण्यात येते, आणि मग त्या पातळ केलेल्या पदार्थाला पुढे शंभरात एक भाग असे पातळ करण्यात येते. ह्यात 1 भाग पदार्थाचा आणि 10,000 भाग घोळ असे प्रमाण असते. 6C घोळणात ही पद्धत 6 वेळा पुनः केली जाते, ज्यात शेवटाला तो मूळ पदार्थ 100−6=10−12 (1 भाग 1 खरबमध्ये किंवा 1/1,000,000,000,000). च्या भाज्याने विभाजीत झालेला असतो. त्यापेक्षा अधिक घोळणात परत हीच पद्धत अवलंबली जाते. होमिओपॅथी मध्ये, जीतका पातळ घोळ असेल त्यात तेवढीच जास्त उर्जा असते असे मानले जाते, आणि जास्त पातळ पदार्थ होमिओपॅथच्या मते जास्त ताकदवान आणि सखोल उपाय करणारे मानण्यात येतात. परिणामी तो इतका पातळ करण्यात येतो की तो पदार्थ घोळात अविभेद्य होवुन जातो (शुद्ध पाणी, साखर आणि अल्कोहोल).

हॅनिमॅन जास्तीतजास्त कारणांसाठी 30C घोण इष्ट मानत असे (म्हणजे, 1060) च्या भाज्याने घोळलेला). हॅनिमॅन च्या काळी असे मानले जात असे की उपाय अनिश्चित कालापर्यंत घोळले जाउ शकतात कारण त्या काळात अणू आणि परमाणूची कोणत्याही रासायनिक पदार्थात संभाव्य मात्रा ही फार लहान असते ह्या अवधारणाला नुकतीच सुरुवात झाली होती. सर्वात मोठ्या घोळणात संभावित मूळ पदार्थाचा एक अणू 12C इतका पातळ असू शकतो.

सिद्ध करणे

हॅनिमॅनने रोग्यावर हे उपाय वापरण्याआधी स्वतःवर आणि इतरांवर कित्येक वर्ष प्रयोग करुन पाहिले. त्याच्या प्रयोगात पहिल्यांदा आजा-यांना उपाय देणे नसायचे, कारण त्याने विचार केला की रोग्यामध्ये सर्वात जास्त समान उपाय करुन रोगाची स्व लक्षणे आपल्या क्षमतेच्या आधारावर निर्माण करण्याने हे ठरविणे कठीण होईल की कोणती लक्षणे स्वतः रोगामुळे आहेत आणि कोणती उपायामुळे. म्हणूनच रुग्ण त्याच्या ह्या प्रयोगांमध्ये समाविष्ट नव्हते. कोणत्या रोगावर कोणता उपाय योग्य राहील हे ठरविण्याच्या पद्धतीला सिद्ध करणे किंवा प्रूव्हिंग असे म्हणण्यात आले, जर्मन शब्द प्रूफूंग (म्हणजे चाचणी) वरुन. होमिओपॅथीमध्ये प्रूव्हिंग ही पद्धत आहे ज्यामध्ये होमिओपॅथीक उपायाची रुपरेखा शोधली जाते.

"सक्रिय" घटक

उपायांवरील घटकांच्या यादीतील उपायांतील सामिल सामग्री वरुन वापरकर्त्यांना ते घटक त्यातील पदार्थात सामील असल्यासारखे वाटते. सामान्य होमिओपॅथीक अभ्यासकांच्या मते, उपाय बनवितांना हे सक्रिय घटकांपासून तरलतेला सुरुवात केली जाते व क्रमानुसार ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पातळ केले जातात ज्यामुळे शेवटच्या उत्पादनात शेवटी जसा म्हणावा तसा "सक्रिय " घटक जैविकरित्या उरतच नाही. घटकांची यादी ही साधारण मूळ उपाय बनवितांना वापरात येणा-या घटकांची असते. खालील उदाहरण पहा -

संबंधित प्रथा

आयसोपॅथी

आयसोपॅथी ही होमिओपॅथी मधून उत्पन्न झालेली चिकित्सा आहे आणि त्याचा शोध जोहान जोसेफ विल्हेम लक्स याने 1830 साली लावला. आयसोपॅथी आणि होमिओपॅथी मध्ये फरक त्याच्या साधारण उपायांवरुन, "नोसोडज्" वरुन केला जातो, ते एकतर रोग उत्पन्न करणा-या पदार्थांपासून किंवा रोगात उत्पन्न झालेल्या पदार्थांपासून केले जातात, उदा. पू. अनेक तथाकथित "होमिओपॅथीक लसीं" ह्या आयसोपॅथी निर्मीत असतात.

पुष्प उपाय

पुष्प उपायात फुले पाण्यात घालून ठेवली जातात व त्यांवर सूर्यप्रकाश पाडला जातो. ह्यात पसिद्ध म्हणजे बाख पुष्प उपाय, ज्याची उत्पत्ती चिकित्सक आणि होमिओपॅथ एडवर्ड बाख यांने केली होती. जरी या उपायांचे समर्थन जगापर्यंत होमिओपॅथीच्या जीवन-शक्तिवादाने पोहोचविले आणि असे म्हटले जाते की हे होमिओपॅथाप्रमाणेच काल्पनिक "जीवन शक्तिने" उपाय करतात तरी याची बनविण्याची पद्धत वेगळी आहे. बाख पुष्प उपाय हा "नाजूक" पद्धतीने बनविला जातो उदा. सूर्यप्रकाशातील पाण्याच्या भांड्यात पुष्प रचणे, आणि हा उपाय वैज्ञनिक नाही. असा कोणताही ठोस वैज्ञानिक किंवा नैदानिक पुरावा नाही की पुष्प उपाय काम करतात.

इलेक्ट्रोहोमिओपॅथी

इलेक्ट्रोहोमिओपॅथी ही 19 व्या शतकात वापरात येउ लागली, यात होमिओपॅथी आणि इलेक्ट्रिक चिकित्सेचा समावेश आहे.

राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कोलकाता

राष्ट्रीय होमिओपॅथी संस्थे (NIH) ची स्थापना 10 डिसेंबर 1975 साली कोलकाता येथे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून झाली. ह्या संस्थेतर्फे होमिओपॅथीत 1987 पासून पदवी अभ्यासक्रम आणि 1988-99 पासून स्नातकोत्तर अभ्यासक्रम देण्यात येतो. 2003-04 पर्यंत NIH हे कलकत्ता विश्वविद्यालयाशी संबद्ध होते आणि 2004-05 पासून आजतायगत पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विश्वविद्यालयाशी संबद्ध आहे. NIH तर्फे शिक्षक आणि चिकित्सकांसाठीचे नियमित अभिविन्यास प्रशिक्षण अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत.

BHMS अभ्यासक्रम हा 5 ½ वर्ष कालावधीचा आहे (ज्यात 1 वर्ष अनिवार्य निवासी सेवा समाविष्ट आहे). MD (होम) तीन विषयाचा अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. उदाहरणार्थ तर्कशास्त्र चिकित्सा, रिपोर्टरी आणि मटेरिया मेडिका. प्रत्येक विषयासाठी सहा जागा उपलब्ध आहेत.

आयुष विभागाची प्रकाशने

  • आयुष प्रणालीमधील रोग-क्रमाने माहिती
  • आयुष बद्दलच्या कल्पना आणि सत्य
  • आयुष मधील मार्गदर्शिका आणि IEC सामग्री

 

स्त्रोत : आयुष विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate