गावपातळीवरील कार्यकर्त्यास रोग्यावर उपचार सुचवावे लागतात. काही ठिकाणी व्यायामाची गरज माहीत असूनही हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागातील साधने नसल्याने काय करावे हा बिकट प्रश्न पडतो. पाय, हात अधू झालेल्या माणसास दुस-या व्यक्तीच्या मदतीनेच त्या केंद्रापर्यत पोचता येते. या पोचण्या - परतण्यामध्ये सोबतच्या व्यक्तीचा रोजगार बुडतो. म्हणून तज्ज्ञाने सुचवलेले असले तरी उपकरणांच्या व्यायामांचा प्रत्यक्ष वापर फारच कमी होतो.
अशा वेळी घरच्या घरी, घरातील सतरंजी, चटईवर प्रयत्न करता येतो. यासाठी घरातील कळत्या माणसाची मदत घ्यावी. केंद्रामधील उपकरणे स्प्रिंगा, चक्रे, रबरी पट्टे, घट्ट सायकली अशा प्रकारची असतात. त्यांतील तत्त्व म्हणजे शरीराला न जमणारे काम करावयास शिकवण्यासाठी थोडा अधिक दाब, ओढ लावण्याचे असते. आपल्या लोकांना जमिनीवर बसून अनेक गोष्टी करण्याची सवय असते. मात्र अनेक उपकरणे पाश्चात्त्य वळणाची असल्याने उभ्या स्थितीवर अधिक भर देतात.
योगासनाद्वारे उपकरणाऐवजी शरीराच्याच अवयवांनी दाब, ओढ, ताण देता येतात. यासाठी योगाचरणातील अनेक आसने फार चांगली उपयोगी पडतात. योगासने म्हटली की ती एकदम चित्रात दाखवल्याप्रमाणे तंतोतंत झालीच पाहिजेत असे नाही. ज्यांना योगासन प्रावीण्य मिळवायचे असेल त्यांना ते ठीक आहे. पण आजार, दुबळेपणा दुरुस्त करण्यासाठी चित्रासारखी हुबेहुब स्थिती जमावी लागतेच असे नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/25/2020
२१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि योगाचे महत्त्व ...
पोटावर झोपून दोन्ही पाय सरळ स्थितीत वर उचलून स्थिर...
विपरीत शयनस्थिती. पाठीमध्ये संपूर्ण कमान, मागील बा...
या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने य...