या आसनात शरीराची स्थिती नौकेप्रमाणे होत असल्याने या आसनास नौकासन असे म्हणतात.
कृती
- पोटावर झोपावे (पालथे) हनुवटी जमिनीवर ठेवावी. दोन्ही हात सरळ मांड्याजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीव टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवाव्यात. पायांच्या बोटांची नखे जमिनीवर टेकतील.
- दोन्ही हात खांद्याच्या वरून डोक्याकडे सरळ नेऊन जमिनीवर टेका. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवा.
- श्वास सोडा व श्वास घेत घेत पुढून हात व मान व मागून पाय सरळ ठेवून सावकाश वर उचला. हात व पाय जास्तीत जास्त वर उचलून तशाच अवस्थेत स्थिर रहा. आणि श्वसन संथपणे चालू ठेवा. दंड कानाजवळ येतील असे हात सरळ ठेवा. ४) आसन सोडताना श्वास सोडत सावकाश खांदे, हात व पाय हळुवार जमिनीवर टेकवा.
फायदे
- पाठीच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यास उपयोग होतो.
- पचनाच्या तक्रारींवरही हे आसन अधिक उपयुक्त ठरते.
स्त्रोत : ग्लोबल मराठी
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.