आयसोमेट्रिक (स्थितियुक्त) व्यायामांत स्नायूंची लांबी कमीजास्त न होता तेवढीच राहते. फक्त त्यांतला जोर कमीजास्त होतो. उदा. आपण एखादी वस्तू दाबून किंवा पेलून धरतो तेव्हा अशी क्रिया होते. बुलवर्कर हा प्रसिध्द प्रकारही याच गटातला आहे. या पध्दतीने स्नायू कमी काळात/श्रमात पुष्ट होतात म्हणून शरीरसौष्ठवासाठी या प्रकारचा व्यायाम उपयुक्त आहे. याउलट धावणे, पोहणे, इत्यादी आयसोटोनिक (गतियुक्त) व्यायामांत स्नायूंची लांबी कमी-जास्त होत राहते (आकुंचन-प्रसरण). यात श्रम जास्त लागतात. स्नायू तयार व्हायला खूप काळ जावा लागतो, पण त्यांची शक्ती जास्त दिवस टिकून राहते.
या दोन प्रकारांतला फरक हातगाडीच्या उदाहरणाने नीट समजेल. हातगाडी ओढताना पायांची हालचाल होते (गतियुक्त) मात्र हात जोर लावूनही स्थिर आहेत (स्थितियुक्त) त्यामुळे हातांना आणि पायांना वेगवेगळा व्यायाम घडतो. दोन्हीकडे जोर लावायलाच लागतो, पण वेगवेगळा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते.
योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याश...
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा अ...