कोठलाही कठोर व्यायाम करण्याआधी काही मिनिटे शरीर-सरावासाठी हलका व्यायाम करावा लागतो. त्यामुळे शरीर व हृदय पुढच्या कष्टांना सज्ज होते.
एकदम जास्त व्यायाम सुरु केला तर हृदयावर त्याचा अचानक ताण येतो. हे टाळले पाहिजे. मैदानात मुख्य खेळाआधी खेळाडू मैदानाला चक्कर मारतात, उडया मारतात किंवा हात पाय ताणण्याचे प्रकार करतात ते यासाठीच. शिवाय यात स्नायू-सांध्यांना हलका ताण दिल्याने हालचाली सहज होतात हा देखील उपयोग आहे. इंग्रजीत याला वॉर्म-अप म्हणतात. यामुळे प्रत्यक्ष खेळातल्या स्नायूंच्या जखमा कमी होतात. जोरकस व्यायाम एकदम संपवणेही बरोबर नाही. असा व्यायाम हळूहळू कमी करत आणला पाहिजे. यामुळे हृदयाला कमी श्रमाशी व रक्तप्रवाहाशी जमवून घ्यायला सोपे पडते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/4/2020
योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याश...
जे लोक व्यायाम करीत नाहीत त्यांना आज ना उद्या आरोग...
व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते.
ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा अ...