मुद्रित माध्यम एक प्रभावी माध्यम समजले जाते. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके आदींच्या स्वरुपात मुद्रित माध्यमे लोकांसमोर येत असतात. प्रत्येकाच्या घरात किमान एकतरी पुस्तक, वर्तमानपत्र, मासिक सापडतेच अर्थात या क्षेत्राशिवाय माणसाचे कोणतेही काम पुढे जाऊ शकत नाही. पुस्तकांच्या रुपात ज्ञान आणि माहिती चिरकाल टिकत असते. त्यामुळेच प्रिंटींग क्षेत्रास विशेष महत्व आहे. पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे समाजावर मोठा परिणाम करत असतात. एका अर्थाने वैचारिकदृष्ट्या ज्ञानाआधारित समाज उभारण्याचे काम ही माध्यमे करत असतात. शिक्षण क्षेत्रही या मुद्रित माध्यमावर अवलंबून आहे. जोन्स गुटेनबर्ग हा या तंत्रज्ञानाचा खरा उद्गाता आहे. तंत्रज्ञान विस्तारत असल्याने नवनव्या कल्पना या क्षेत्रात आता येत असून या क्षेत्रात ज्ञानावर आधारित कौशल्याची गरज भासतेय. सेटिंग, डिझाईनींग, प्लेट मेकिंग, इमेज सेटिंग, कॅमेरा वर्क, प्रिंटींग आणि बायडिंग अशी कामे यात अंतर्भूत असतात. या क्षेत्राचा थोडक्यात घेतलेला आढावा खास करिअरनामासाठी..
या क्षेत्रात नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तरुणही या क्षेत्राची निवड करून उत्तम प्रकारे आपल्या करिअरच्या दिशा ठरवू शकतात. या क्षेत्रात पुढील ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
पदविका - (प्रिंटींग) पात्रता - यासाठी गणित आणि विज्ञान विषयासहित दहावी पास. कालावधी ३ वर्षे.
पदवी - बी.टेक / बी.ई (प्रिंटींग/ पॅकेजिंग तंत्रज्ञान ) पात्रता- बारावी पास भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयातून. कालावधी ४ वर्षे. पदव्युत्तर पदवी - एम.टेक पात्रता बी.टेक / बी.ई (प्रिंटींग/ पॅकेजिंग तंत्रज्ञान ) कालावधी- ४ वर्ष.
मित्रहो प्रिंट माध्यमाचा मोठा प्रभाव समाज घडविण्यात असतो. जरी डिजीटल युगाचा प्रारंभ झाला तरी या माध्यमाचे महत्व अधोरेखित करण्यासारखे आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. पण त्यासाठी योग्य ती पात्रता आणि या विषयातील नाविन्यपूर्ण कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे. चला तर मग ही करिअरची नवीन वाट निवडूया...
लेखक - सचिन पाटील
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/26/2023
दहावी आणी बारावीचे निकाल जवळ आले आहेत. यानंतर खऱ्य...
डीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगन...
दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 'क...
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्...