या विभागात पॉलिनीशिया, मेलानीशिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड, फिजी, न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतील पुराणकथा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. बहुतेक ठिकाणी सर्वव्यापक अशा भागाची नियंत्रक मानली जात असे. युध्द, विवाह, सुफलता, गुन्हेगारी इत्यादींचे स्वतंत्र देव मानून त्यांमध्ये श्रमविभागणी केली होती. मानव,पशू पक्षी, दगड, खडक, ठिणग्या धुमकेतू इ. विविध रुपांतून देवतांचे अस्तित्व मानले जाई. २४ पोटे, आठ डोळे, आठ हात इत्यादींनी युक्त असलेल्या विचित्र शरीरांचीही कल्पना केली जाई. काही देव अज व नित्य असे होते, तर काही कल्पना केली जाई. काही देव अज व नित्य असे होते. तर काही मृतात्म्यांचे दैवतीकरण करण्यात आले होत. विश्वनिर्मिती सूर्यचंद्र, परलोक इत्यादींविषयीच्या कथा अधिक प्रमाणात आढळतात.
पृथ्वी, आकाश, समुद्र इत्यादींचे अस्तित्व गृहीत धरून पुढची निर्मिती सांगणार्या अनेक कथा आहेत. पृथ्वी वगैरेंची निर्मिती सांगणार्याव कथाही आहेतच, अंड्यातून निर्मिती झाल्याच्या कथा बोर्निओ, सोसायटी, इ. ठिकाणी आहेत. शून्यातून व धुक्यातून निर्मिती झाल्याच्या कथा अनुक्रमे पॉलिनीशिया व नीआस बेटात आहेत. आकाशातून फेकलेल्या वा समुद्रातून माशांप्रमाणे पकडून आणलेल्या पदार्थांपासून पृथ्वी व बेटे बनली असे अनेक कथांतून आढळते, पृथ्वीवरच्या वनस्पती म्हणजे आकाश या तिच्या नवर्यामने वा टाहूने या तिच्या पुत्राने तिच्या अंगावर घातलेले दागिने होत, असे न्यूझीलंडमध्ये मानतात. प्रारंभी स्वर्ग व पृथ्वी हे दांपत्य एकमेकांच्या जवळ होते, परंतु माउइ या वीराने वा अन्य कोणी तरी त्यांना एकमेकांपासून समुद्र बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी आतानुआ हीच्या बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी शाईपासून समुद्र बनल्याची कथा आहे. आतेआ या देवाची मुलगी आतानुआ हीच्या गर्भपाताच्या वेळी प्रवाहित झालेल्या द्रवापासून समुद्र बनला, अशी कथा मार्केझास बेटात आहे.
स्वर्गीय देवीला नाकातून वा बाहूतून मूल झाले, इ. प्रकारच्या कथा आढळतात. महापुराच्या वळी पर्वताचा आश्रय घेतलेल्या मानवांच्या पायाला पाणी लागल्यावर त्याचे काळ्या हंसात रूपांतर झाले, अशी कथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया प्रदेशात आढळते. स्वर्गातून पडलेल्या झाडाच्या पानांपासून प्राणी बनले, असे बोर्निओमध्ये मानले जाते. काळ्या व उजळ अशा दोन नारळांपासून एक काळी व एक गोरी स्त्री निर्माण झाली अशी एक कथा आढळते.अग्निप्राप्तीच्या विविध कथाही आहेत. स्वर्गाने पृथ्वीसाठी ढाळलेले अश्रू म्हणजे दवबिंदू व पृथ्वीने स्वर्गासाठी टाकलेले उसासे म्हणजे धुके, असे न्यूझीलंडमध्ये मानतात. ईम्यू पक्ष्याच्या आकाशात फेकलेल्या अंड्यापासून सूर्य बनला, असे ऑस्ट्रेलियात मानतात. आद्य प्राण्याच्या डोळ्यांपासून सूर्य-चंद्र बनले, अशा आशयाच्याही अनेक कथा आहेत.देवाने स्वर्ग व पृथ्वी यांना अलग केल्यावर स्वर्ग हा पिता नग्न असल्याचे पाहून त्याने ताऱ्याच्या रूपाने त्याला वस्त्र दिले;मृत व्यक्ती तारे बनतात इ. आशयाच्या कथा आढळतात.
मानव हा प्रारंभी मर्त्य नव्हता. कलांनी वाढणारा चंद्र, कात टाकणारा साप वा तोडल्यावरही फुटून येणारा वृक्ष यांच्याप्रमाणे तो होता,असे मानले होते. मानवाला सापाप्रमाणे त्वचा बदलता येई. विशिष्ट कारणाने तो मर्त्य झाला. मृत्यूनंतर अनेक अडचणींना तोंड देत आत्मा परलोकात जातो आणि त्याच्या शक्तिप्रमाणे वा ज्येष्ठतेप्रमाणे त्याला तेथे दर्जा मिळतो .पॉलिनीशियातील माउई या मृतवीराचे दैवतीकरण करण्यात आले होते. त्याने पृथ्वीवर अग्नी आणला, समुद्रातून बेटे वर काढली, सूर्याची गती कमी केली आणि मानवांना अमर बनविण्याच्या प्रयत्नात तो मरण पावला इ.कथाही आढळतात.
संदर्भ : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.
2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.
3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.
4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.
5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.
6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.
7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922
8. Gray, L. H. Ed. The Mythology of all Races, 13 Vols., Boston 1925-36.
9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.
10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.
11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.
12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.
13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.
14. Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.
15. Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.
16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.
17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.
18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth ,London 1963.
19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.
20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.
21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78.
लेखक: आ. इ. साळुंखे
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/4/2020
आफ्रिकन पुराणकथा विषयक माहिती.
केल्टिक पुराणकथा विषयक माहिती.
ईजिप्ती पुराणकथा विषयक माहिती.
अमेरिकन इंडियन जमातींच्या पुराणकथा विषयक माहिती.