অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला आणि विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात ते धोरण स्वीकारले.
या धोरणानुसार देशात पहिले आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1986 साली विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे स्थापित झाले आणि त्यास एन.टी.रामराव यांचे नांव दिले गेले. त्यानंतर 1994 साली कर्नाटक सरकारने राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू केले. 1997 साली तामिळनाडू राज्य सरकारने एम.जी.आर. आरोग्य विज्ञान विद्यापीठ सुरू केले. आपले हे देषातील चैथे विद्यापीठ असून आतापर्यंत 13 आरोग्य विद्यापीठे देशात स्थापन झाली आहेत.
महाराष्ट्र सरकारने नाषिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि भारतीय पध्दतीचे वैद्यकीय शिक्षण यांचा समतोल विकासासाठी तसेच आरोग्य विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता नियोजनबध्दरित्या वाढण्याच्या दृष्टीने राज्यात हया विद्यापीठाची निर्मिती केली.
महाराष्ट्र राज्याचे महनीय राज्यपाल श्री.चेन्नामनेणी विद्यासागर राव हे म.आ.वि.वि.चे कुलपती असून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे हे सह कुलपती आहेत.

नाशिकच्या दिंडोरीरोड म्हसरूळ शिवारात 51 एकर क्षे़त्रात म.आ.वि.वि.ची निर्मिती करण्यात आली आहे. या परिसरात मुख्य प्रशासकीय भवन, शिक्षक प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, आतिथीगृह, माननीय कुलगुरूंचे निवासस्थान व अधिकाऱ्‍यांसाठी क्वार्टर्सच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. उत्तम व तत्पर प्रशासनासाठी विद्यापीठाने प्रशासन, अॅकॅडमिक, वित व परीक्षा विभागाचे संगणकीकरण केले आहे. व्हीडिओ काॅन्फरन्सच्या दृष्टीने विद्यापीठ व मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद प्रादेशिक विभाग जोडण्यात आले आहे. अनेक बैठका या व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे होत असतात.
अनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जे पूर्वी परंपरागत विद्यापीठाषी संलग्न होते ते म.आ.वि.वि.नाशिकच्या कार्यक्षेत्रात आले आहेत. विद्यापीठ स्थापन करण्याच्या वेळी 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये एकूण 11995 विद्याथ्र्यांच्या जागासहित आणि खालील संस्था विद्यापीठाशी संलग्न झाल्या आहेत.

गेल्या 15 वर्शात विद्यापीठाने विविध प्रकारे संलग्न महाविद्यालयांच्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात अमुल्य चांगल्या सुधारणा तसेच महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधा आणि हाॅस्पिटलच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची सक्तीने उपस्थिती, अभ्यासक्रमात नियमित अद्ययावतीकरण, वेळापत्रकाची निष्चिती, विद्यार्थीनिहाय शिक्षण कार्यक्रम, सर्व विभागाच्या अभ्यासक्रमाचे नियोजन फिरत्या स्वरूपात सक्तीच्या इंटर्नशीप कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची क्षमता सुधारीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्यतत्वे आणि शिष्टाचार अंगिकारून सामजिक प्रश्नांची उकल करण्याचे शिक्षण देण्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात सापेक्ष डाॅक्टर विद्यार्थ्यांची संवाद कला सुयोग्य व सुधारीत करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचा सहभाग सुकर होणार आहे. विद्यापीठाने ‘डिजिटल’ ग्रंथालय निर्माण केले आहे. त्यामुळे सुमारे 2500 जर्नल्समध्ये महाविद्यालयांचा आणि व्यक्तीशः विद्यार्थ्यांचा सहभागाचा दुवा साधण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. पी.एच.डी.साठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभ केला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एजन्सीशी सांगड घालून विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणातील बदलत्या जागतिकीकरणा संदर्भात थरार संपन्न कल निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याद्वारे सामाजिक व्यावसायिकक्षम डाॅक्टर्स निर्मितीचा ध्यास विद्यापीठाने सुरू ठेवला आहे. आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची संलग्नता

  • मेडिकल 35
  • डेंटल 28
  • आयुर्वेद 62
  • युनानी 06
  • होमिओपॅथी 45

इतर:-बी.पी.टी.एच.,बी.ओ.टी.एच.,बीएससी नर्सिंग,पीबीबीएससी नर्सिंग,
बी.ए.एस.एल.पी., बी.पी.ओ. - 154.
एकूण मआवि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये: 330 (21 मे 2015 पर्यंत)
Quality Policy(गुणवत्तेचे धोरण)
We at MUHS are committed :
आम्ही म.आ.वि.वि. वचनबध्द आहोत.
आरोग्य विज्ञानाच्या शिक्षणाबाबत उच्च दर्जाची गुणवत्ता असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र निर्माण करण्याचा मआवि विद्यापीठाचा प्रयत्न राहील. आरोग्य विज्ञान शिक्षणात नैतिक मुल्यावर आधारीत शिक्षणाचे वातावरण, अष्टपैलु आणि आंतरशिस्तबध्द संशोधन व प्रशिक्षण दिले जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानातून गुणवत्तापूर्ण तसेच कौशल्ययुक्त शिक्षण अंगिकारले जाईल. आरोग्य रक्षणाचा व्यावसायिक ध्यास-दृष्टिकोन असलेल्यांच्या हातून सापेक्ष स्वरूपात समाजाच्या आरोग्याची काळजी करणारी सेवा उत्तम प्रयत्न करील.
परिणामकारक प्रषासनातून प्रामाणिक, पारदर्शक, जबाबदारीची पध्दत अवलंब करून प्रगतशील तंत्रज्ञानाद्वारे एक सर्वोत्तम माॅडेल उभारण्याचा आणि सर्वांचेच समाधान देणारा दर्जा निर्माण केला जाईल.

विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम


Medical

M.B.B.S. ( Bachelor of Medicine and Surgery)

B.P.M.T. ( Bachelor of Paramedical Technology )

M.D. ( Doctor of Medicine)

M.S. (Master of Surgery)

D.M. (Doctor of Medicine)

M.Ch. ( Magister of Chirugie)

Dental

B.D.S. ( Bachelor of Dental Surgery and Medicine)

M.D.S. (Master of Dental Surgery)

Ayurved

B.A.M.S . (Bachelor of Ayurved Medicine & Surgery)

M.D. ( Doctor of Medicine) (Ayurved Vachaspati)

M.S. ( Doctor of Surgery) (Ayurveda Dhanwantari)

Unani

B.U.M.S . (Bachelor of Unani Medical Medicine & Surgery)

M.D. ( Doctor of Medicine) (Mahir-E-Tib)

M.S. ( Doctor of Surgery) (Mahir-E-Jarahat)

Allied Health Sciences

B.P.TH. ( Bachelor of Physiotherapy)

M.P.Th. ( Master of Physiotherapy)

BOP.TH. ( Bachelor of Occupational Therapy)

M.O.Th. ( Master of Occupational Therapy)

B.A.S.L.P. ( Bachelor in Audiology and Speech Language Pathology)

B.SC. (H.L.S.) ( Bachelor of Science (Hearing, Language and Speech)

M.A.S.L.P. ( Master of Audiology Speech and Language Pathology)

B.P.O. ( Bachelor of Prosthetics)

M.P.O. ( Master of Science (Prosthetics and Orthotics)

B.SC. NURSING ( Bachelor of Science in Nursing)

BASIC B.SC. NURSING ( Bachelor of Basic Science in Nursing)

P.B.B.Sc . Nursing ( Post Basic B.Sc. Nursing)

P.B.B.SC. NURSING ( Post Basic Certificate in Bachelor of Science in Nursing)

P.C.B.SC. NURSING ( Post Certificate in Bachelor of Science in Nursing)

M.Sc. Nursing (Medical Surgical Nursing)

(Other Post Graduate Degree, Diploma, Fellowships & Certificate Courses, under various Health Sciences

Faculties, Ph. D, I.P.P.C Inter Post Graduate Paediatric Certificate Course, International Collaborative

Course with University of Sydney Australia)

अव्वल दर्जाचे श्रेष्ठतापूर्ण डिपार्टमेंटस्

  • डिपार्टमेंट आॅफ इंटरडिसीप्लीनरी रिसर्च अॅण्ड टेक्नाॅलाॅजी न्ण्क्ण्प्ण्त्ण्ज्ण्, नाशिक.
  • डिपार्टमेंट आॅफ इन्फेक्शियस डिसीजेस, मुंबई.
  • डिपार्टमेंट आॅफ मायक्रो डेंन्टीस्ट्री, मुंबई.
  • इन्स्टिटयूट आॅफ मेडिकल एज्युकेशन टेक्नाॅलाॅजी अॅण्ड टिचर्स ट्रेनिंग (प्डम्ज्ज्ज्),पुणे.
  • डिपार्टमेंट आॅफ जेनेटिक्स, इम्युनाॅलाॅजी, बायोकेमिस्ट्री अॅण्ड न्युस्ट्रेशन (ळप्ठछ),पुणे.
  • स्कुल आॅफ हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन (डठ।), पुणे.
  • डिपार्टमेंट आॅफ कम्युनिटी आॅप्थॅलमाॅलाॅजी अॅण्ड पब्लिक हेल्थ (क्च्भ्), औरंगाबाद.
  • डिपार्टमेंट आॅफ ट्रायबल हेल्थ, नागपूर.
  • डिपार्टमेंट आॅफ आयुष, नाशिक.

लवकरच सुरू होणारे नवीन डिपार्टमेंटस्

  • डिपार्टमेंट आॅफ हेल्थ कम्युनिकेशन,
  • डिपार्टमेंट आॅफ डिसॅस्टर मेडिसिन,
  • डिपार्टमेंट आॅफ इंटरनॅशनल स्टडीज्

संशोधन कार्यासाठी विद्यापीठाकडून योजना राबविल्या जात आहेत. पीएच.डी. ही सन्मान्य पदवी प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. या संशोधनासाठी 41 संशोधन केंद्रे ठरविण्यात आली आहेत. लॅनसेट च्या धर्तीवर एज्युकेशन फाॅर हेल्थ या नावाचे जर्नल सुरु करण्याचे ठरले आहे. संपूर्ण भारतात आगळे वेगळे ठरणारे आंतरविद्याशाखा संशोधन विभाग विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे. अॅलोपॅथी, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, तत्सम विद्याशाखा यांचा समन्वय साधून संशोधनाला चालना देणारे विभाग येथे आहे.
मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत जगभरात आघाडीवर आहे. अत्यंत कुशल व तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञांची उपलब्धता, अत्याधुनिक रुग्णालये, अद्ययावत तंत्रज्ञान आदिंनी सुसज्ज असलेले काॅर्पोरेट हाॅस्पिटलमधील उपचार हे युरोप-अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त आहेत. यामुळे आज जगभरातून रुग्ण भारतात उपचारासाठी येत आहे. अश्या सर्व बाजूंनी विकसित होणाऱ्‍या हेल्थ केअर इंडस्ट्रीला गरज आहे. ती कुशल मनुष्यबळाची. आरोग्य सेवा देणाऱ्‍या तज्ज्ञांची जशी गरज आहे. तशी या क्षेत्राचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळू शकणाऱ्‍या हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेटर्सची देखील मोठया प्रमाणावर आवश्यकता आहे. वेगाने वाढणाऱ्‍या इंडस्ट्रीजची गरज लक्षात घेऊन विद्यापीठातर्फे वैद्यकीय व्यवसायाच्या व्यवस्थापनासाठी एम.बी.ए. (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेेशन) हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केला आहे. तसेच विविध फेलोशिप व सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. यात वैद्यकीय विद्याशाखेतील सहासष्ट फेलोशिप कोर्सेस आणि चार ट्रेनिंग प्रोग्राम, दंत विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स, आयुर्वेद विद्याशाखेसाठी दोन फेलोशिप कोर्स आणि चार सर्टिफिकेट कोर्स तसेच तत्सम विद्याशाखेसाठी चार फेलोशिप कोर्स आणि तीन सर्टिफिकेट कोर्स असे एकूण चैऱ्या‍हत्तर फेलोशिप आणि चैदा सर्टिफिकेट कोर्स सुरु करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्टिफिकेट कोर्स इन डिझास्टर मेडिसिन आणि फेलोशिप कोर्स इन एमेर्जन्सी मेडिसिन अॅन्ड ट्राॅमा केअर कोर्सेस लवकरच सुरु होणार आहे. आयुर्वेद संशोधनासाठी आयुष विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विविध रुग्णांवर उपचार करुन चिकित्सा पध्दतीची प्रमाणताही सिध्द केली जाणार असून विद्यापीठाच्या परिसरात दुर्मिळ वनौषधींचे उद्यानही साकारले जात आहे. लवकरच क्लिनिकल इंजिनियरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिकारी

  • कुलगुरु- प्रा. डाॅ. अरुण जामकर
  • प्रति कुलगुरु - डाॅ.शेखर राजदेरकर
  • कुलसचिव - डाॅ.काषिनाथ गर्कळ
  • परीक्षा नियंत्रक - डाॅ.कालिदास चव्हाण
  • वित्त व लेखाधिकारी - श्री.एन.व्ही.कळसकर (प्रभारी).
  • जनसंपर्क अधिकारी - डाॅ. स्वप्नील तोरणे

एध्येय आणि उद्दिष्टे ( Aims and Objectives )

  • राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षणात सर्वंकश वाढ करणे.
  • सामाजिक, कौषल्य आणि व्यावसायिक चांगले पदवीधर निर्माण करणे.
  • शिक्षकांची गुणवत्ता वाढविणे.
  • संशोधन कार्यास प्रोत्साहित करणे.
  • समाजाशी वचनबध्द असणे.
  • शिक्षण व संशोधनासाठी श्रेष्ठदर्जाचे व उत्तरदायी प्रशासन, वैज्ञानिक व्यवस्थापन व विकास संघटीत करणे.
  • विद्याथ्र्यांमध्ये विद्यापीठीय आणि तत्संबंधी विषयात गुणवत्तापूर्ण स्पर्धात्मक व कसोटीपूर्ण पात्रता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करणे.
  • ज्ञानाची निर्मिती, संवर्धन आणि प्रसार करण्याची जबाबदारी अंगिकारणे.
  • आरोग्य विज्ञान व शिक्षणाच्या सोयीसुविधांचे समाज वितरणासाठी प्रयत्न करणे.

संशोधन वाढीची कार्यक्षमतापूर्ण कृती (Research promoting Activities)

  • शिक्षकांना संशोधन अनुदान (शिष्यवृत्ती).
  • शिक्षकांना प्रवास अनुदान (शिष्यवृत्ती).
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनांत लेखांच्या प्रसिध्दीसाठी पुरस्कार.
  • विद्याथ्र्यांना संशोधन शिष्यवृत्ती.
  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यशाळेंना अनुदान.
  • चिकित्सालयीन संशोधन पध्दती कार्यशाळेंना अनुदान.
  • पी.एच.डी. पूर्व प्रवेश परीक्षा घेणे.
  • पी.एच.डी. नोंदणी करणे.
  • सहामाही अहवाल.
  • विभागीय पी.एच.डी. सेमिनार.
  • लेखनचैर्यावर दक्षता.

विद्यार्थी कल्याण योजना (Student Welfare Scheme)

  • धन्वंतरी विद्याधन योजना - विद्याथ्र्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचे व्याजासाठी आर्थिक साहाय्य विद्यापीठ देते.
  • सावित्रीबाई फुले योजना-गरजू गरीब विद्यार्थीनीला रू.25,000/- ची षिश्यवृत्ती.
  • पुस्तक पेढी योजना-गरजू गरीब विद्याथ्र्यांना पुस्तकांसाठी रू. 30,000/- चा फंड.
  • नैतिक मुल्यासाठी विशेष बोर्ड - समाजाला उपयुक्त ठरेल अषा वैशिष्टयपूर्ण इतर जादा शैक्षणिक कार्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांना रू.10,000/- विद्यापीठाकडून वितरीत.
  • सुरक्षेसाठी विद्यार्थी संजीवनी सुरक्षा योजना - गरजू विद्याथ्र्यांना वैद्यकीय उपचारासाठी रू.2,000/- ते रू.1,00,000/- दिले जातात.
  • विद्याथ्र्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पालकास रू.1,00,000/- दिले जातात.
  • शिका अन् कमवा - विद्यापीठ षिका अन् कमवा योजनेखाली प्रत्येक विद्याथ्र्याला रू.16,000/- चे साहाय्य देते. त्यामुळे त्याला षिक्षण घेतांना कामाचे महत्व कळते आणि त्याचवेळी उत्पन्नामुळे त्यास मदतही मिळते.

सांस्कृतिक विभाग
कुटुंब दत्तक योजना- या योजनेनुसार प्रत्येक महाविद्यालय एक गांव दत्तक घेते आणि त्या परिसरात प्राथमिक आरोग्य रक्षा सुविधा पुरवते. तसेच गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करते. प्रत्येक विद्यार्थी 3 ते 4 कुटुंब दत्तक घेतात.
मानसिक समुपदेषन - ताणतणावाखाली विद्याथ्र्याला अभ्यासात अपयष आल्यास त्याला औदासिन्य आणि नैराश्यपासून परावृत्त करण्यासाठी विद्यापीठाने नवीन कार्यक्रम हाती घेतला असून त्याला मानसिक समुपदेशानाद्वारे ताण-तणाव व शैक्षणिक अपयशापसून परावृत्त केले जाते. एन.एस.एस.विभाग - नॅशनल सव्र्हिस स्कीम छैै हा केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त कार्यक्रम आहे.

शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी

सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (Continuing Medical Education) आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक कौशल्य विकास (Continuing Professional Development) या कनिष्ठ मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील शिक्षकांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱ्या बाबी असतात. यामुळे विशिष्ट विषयातले अद्ययावत ज्ञान व माहिती शिक्षकांना प्राप्त होऊ शकते. या मध्यवर्ती संकल्पनांमधूनच शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची अद्ययावत व देखणी वास्तू आरोग्य विद्यापीठाच्या प्रांगणात उभी राहिली आहे. यामध्ये आरोग्यशास्त्र शाखांच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचा विकास, शिकवण्याची नवनवीन तंत्रे व पध्दती, मूल्यमापनाच्या पध्दती आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करावयाचे प्रयत्न या बाबतचे प्रशिक्षण देणे असा या मागील उद्देश आहे. या प्रबोधिनीमध्ये 1000 आसन क्षमतेचे प्रेक्षागृह, 108 आसन क्षमतेचे बहुद्देशीय सभागृह, 80 आसन क्षमतेचे सभागृह, अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त काॅन्फरन्स, व्हीआयपी बहुद्देशीय रुम, 150 आसन क्षमतेचे अत्याधुनिक विजेवरील उपकरणे असलेले अॅम्पीथिएटर आदी सर्व वातानुकुलित असलेली शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीची वास्तू आहे.

वैद्यकीयशास्त्र इतिहास संग्रहालय

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संपूर्ण आशिया खंडात आगळे वेगळे ठरले असे आरोग्य विद्याशाखांचे वस्तुसंग्रहालय(Museum of History of Medicine) विद्यापीठाच्या मुख्यालयातील आवारामध्ये आकाराला आले आहे. आरोग्यशाखांच्या पाचही विद्याशाखांच्या उगमापासूनच्या आजवरचा सर्व प्रवास या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून दर्शविला आहे. वैद्यकशास्त्राच्या विविध शाखांच्या अभ्यासासाठी व भविष्यातील संशोधनाची दिशा ठरविण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास, संदर्भ विशेष उपयुक्त ठरतात. या संग्रहालयामध्ये व्यक्ति चित्रे, कालदर्शिका, अर्धपुतळे साधने, छायाचित्रे, तक्ते, विविध वस्तू, त्रिमितीय देखावे आदींच्या सहाय्याने हा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिकमधील हे आगळे वेगळे वस्तुसंग्रहालय केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील जिज्ञासंूना ज्ञानाचा आगळा वेगळा खजिनाच उघडून देणारे आहे. -

 

डाॅ.स्वप्नील सुधाकर तोरणे, जनसंपर्क अधिकारी,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक.

माहिती स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 11/3/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate