केसरीया बालम आवोनी,
पधारोनी म्हारे देस रे,
पधारोनी म्हारे देस...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार करणार्या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि ईमानी चेतक ह्याच मातीतले...
चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...
अरावली पर्वतरांगांनी राजस्थानचे दोन भाग केले आहेत. पुर्वेला मेवाड आणि पच्शिमेला मारवाड. मेवाडचे लोक लढवय्ये होते तर मारवाडचे लोक हे धंद्यात अतिशय हुशार...
आपल्याला वाटतो तेव्हढा रा्जस्थान रूक्ष नाहिये. मेवाड पट्टा बर्यापैकी हिरवा आहे. थर चे वाळवंट हे जैसलमेर आणि बिकानेर (मारवाड) च्या भागात आहे. ईथे फार प्राचीन काळी समुद्र होता. आजही ह्या वाळवंटात समुद्रजिवांचे जिवाश्म मिळतात.
भटकंतीस योग्य काळ : नोव्हेंबर ते जानेवारी. डिसेंबर-जानेवारी मध्ये दिवसाचे तपमान अतिशय छान आणि आल्हाददायक असते. डिसेंबर मध्ये जैसलमेर भागात रात्रि अतिशय कडाक्याची थंडी असते. ईथे ऊन्हाळा अतिशय तीव्र असतो.
आम्ही पाहिलेली स्थळे: उदयपुर, चित्तौडगढ, माऊंट अबू, जोधपुर, जैसलमेर, तनोट, अजमेर आणि जयपुर.
दिवसः १० ते १२
उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्यावर बांधला. ह्या महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर, उपहारगृह असे बरेच काही आहे.
लेक पॅलेस हे हॉटेल पिचोला सरोवराच्या मध्ये एका लहान द्विपावर स्थित आहे. हा महाल/हॉटेल महाराणा जगत सिंग दुसरा याने १६४६ - १७४३मध्ये बांधला. ईथे बर्याच चित्रपटांचे चित्रिकरण होते. गाजलेला बाँडपट "ऑक्टोपसी" त्यातलाच एक.
उदयपुर मध्ये महाराणा प्रताप यांचे एक स्मारक आहे. उदयपुरमध्ये "सहेलियो की बाडी" म्हणून एक ऊद्यान आहे. ह्या ऊद्यानात बरीच कारंजी आहेत. हे ऊद्यान महाराणा भुपाल सिंग ने त्याच्या राणी साठी बांधले. ह्या ऊद्यानाची एक खासियत अशी कि ईथली सर्व कारंजी गुरुत्वाकर्षणाच्या बलावर चालतात.
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्राेत - मायबोली
अंतिम सुधारित : 4/24/2020
बांसवाडा संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थान राज्य...
चित्तौड़गढ़ किल्ला हा भारतातील प्रसिद्ध किल्ल्यांप...
जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल...
भरतपूर : राजस्थान राज्याच्या भरतपूर जिल्ह्याचे मुख...