मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपल्यापैकी काही जणांनी केलेल्या विनंतीचा मान ठेऊन, १ मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून मी "अतुल्य ! भारत" ह्या मालिकेत पंजाब ऐवजी, "महाराष्ट्र" हा भाग सादर करत आहे. तसे "महाराष्ट्र" हे खरोखरच महा राष्ट्र असल्यामूळे मला हे राज्य ३-४ भागात प्रकाशित करायचे होते. पण हा खास भाग असल्यामूळे मी येथे महाराष्ट्रात काढलेली माझी सर्वोत्तम (माझ्या दॄष्टिने) प्रकाशचित्रे प्रदर्शित करत आहे. "महाराष्ट्र" हे राज्य मी पुन्हा सविस्तर पणे अनुक्रमणीकेनुसार प्रदर्शित करेनच.
आपल्यापैकी कुणालाही "महाराष्ट्र"अनोळखी नाहिये. योगेश, विमुक्त, Yo.Rocks, असुदे, शैलजा, किरू, प्रकाश ह्या सारख्यां मातब्बर मंडळींनी बरीच मुशाफिरी करून बरेच लिखाण आणि प्रकाशचित्रे प्रदर्शित केलेली आहेत. त्या मध्ये हा माझा खारीचा वाटा. आशा आहे आपल्याला कंटाळा नाही येणार.
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प हा नागपुर पासुन ५ तासांवर तर चंद्रपुर पासुन अर्ध्या तासवर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपुर आहे. रहाण्यासाठी तुम्हाला ताडोबा अभयारण्याच्या जवळ MTDC च्या छान आणि निटनेटक्या कोटेजेस् मिळू शकतात पण त्यांचे booking आधी करावे लागते. कोटेजेस् च्या शेजारीच एक मोठा तलाव आहे. ईथे काही खाजगी रीसॉर्टस् ही आहेत पण त्यांचे व्यवस्थापन अतिशय गचाळ आणि गलीच्छ आहे. खाजगी रीसॉर्टस् वाले फक्त तुमच्या पैशाच्या मागे असतात. आम्ही दोन्ही ठीकाणी वास्तव्य केल्यामूळे काही ठळक फरक लक्षात आले.
ताडोबा अभयारण्यात वन्य पशू पहाण्यास जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे ऊन्हाळा. ह्या काळात अभयारण्याच्या आत असलेले छोटे छोटे पाणवठे कोरडे पडतात म्हणून वन कर्मचारी वाटे शेजारी खास बांधलेल्या पाणवठयावर जनावरांसाठी टँकरने पाणी सोडतात आणि ते प्यायला जनावरे हमखास पाणवठयावर येतात.उन्हाळ्यात गेलात तर शक्यतो वातानूकुलित कोटेजेस् घेण्याचा प्रयत्न करा कारण ईथला उन्हाळा फार कडक असतो.
ताडोबा अभयारण्यात जाण्यासाठी दोन सेशन्स असतात. एक सकाळी ६ ते ११ आणि एक दूपारी ३ ते ६. दोन्ही वेळेला वाटाड्या बरोबर असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला आत मध्ये प्रवेश दिला जात नाही. हे वाटाडे सरकारी कर्मचारी असून ते तुम्हाला ताडोबा अभयारण्यात प्रवेशद्वाराजवळ मिळतात. हे वाटाडे तज्ञ आणी चांगले माहितगार असतात. तुम्ही तुमची गाडी आत नेऊ शकता किंवा तुम्हाला वन खात्याची Open Gypsy भाडे भरुन मिळू शकते.
(एव्हढे करुन, दोन वेगवेगळ्या सिझन मध्ये जंगलाला एकूण ५ वेळा भेट देउनही वाघ दिसला नाही हा भाग वेगळा. दुर्दैव दुसरे काय. पण ईतर प्राणी पाहून मजा आली)
स्त्राेत -मायबोली
अंतिम सुधारित : 6/30/2020
जुलै-१९७० मध्ये क्रीडा व युवक सेवा या स्वतंत्र संच...
सन १८८१ च्या फ़ेमीन कमीशनने शिफ़ारस केल्यानुसार जुर्...
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...
या भागात महाराष्ट्र राज्याविषयी माहिती दिली आहे.