'मराठी भाषा विभाग' असा स्वतंत्र प्रशासकीय विभागाकडून भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या विभागांचे प्रशासकीय नियंत्रण केले जाते. तसेच शासनाच्या इतर विभागांच्या अखत्यारीतील मराठी भाषेशी संबंधित विषयांवरही हा विभाग प्रशासकीय नियंत्रण ठेवतो.
या विभागाने महा ऑनलाईन संस्थेमार्फत आपल्या विभागाची संपूर्ण माहिती प्रदर्शीत करणारे सर्वांगीण संकेतस्थळ विकसित केले असून या संकेतस्थळाचा पत्ता www.marathibhasha.maharashtra.gov.in असा आहे. सदर संकेतस्थळाचा आराखडा आणि विकासकार्य राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स धोरणाचे पालन करत असून त्यासाठीच्या W3C XHTML1.0 आणि W3C CSS या दोन्ही तांत्रिक पात्रता पूर्ण केल्या आहेत. या प्रकल्पाचा संपूर्ण डाटा शासकीय डाटा सेंटरवर ठेवण्यात आलेला आहे.
या संकेतस्थळाचे मुख्यत्वे पाच भाग केलेले आहेत. 'लेखन दोष' या शिर्षकाखाली मराठी भाषा विभागाची संरचना, मराठी भाषा विभागातील अधिकाऱ्यांची माहिती व संपर्क, या विभागाशी संबंधित शासकीय निर्णयांची यादी, शीर्षकनिहाय व दिनांकनिहाय शासन निर्णय शोधण्याची सुविधा, कायदे/ नियम, इतर महत्वाच्या बाबी या उपविभागात मराठी भाषा विभागाच्या निर्मितीनंतरच्या घडामोडी, विभागाचे वार्षिक कार्यक्रम अंदाजपत्रक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या उपविभागात आजपर्यंत झालेल्या सर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल वर्ष, ठिकाण, अध्यक्ष हा तक्ता दिलेला आहे. 'ताज्या घडामोडी' या भागात मराठी भाषा विभागासंदर्भातील बातम्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे तर 'संबंधित संकेतस्थळे' या भागात भारत सरकारचे संकेतस्थळ, महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळ आणि महान्यूज या संकेतस्थळांच्या लिंक दिलेल्या आहेत.
शासन व्यवहार कोशाचे संदर्भ घेऊन मराठी भाषेच्या अद्भुत विश्वात आपले स्वागत करत 'ई-शब्दकोश' या सदरात इंग्रजी शब्द देऊन त्याचे मराठीतले शब्द पर्याय देण्यात येतात तसेच मराठी भाषेत शब्द देऊन त्याचे प्रतिशब्द मिळवता येतात. 'आद्य ग्रंथ' या शीर्षकाखाली मराठी साहित्याच्या आरंभाबद्दल माहिती तर 'कविता' या शीर्षकाखाली काही निवडक कविता देण्यात आलेल्या आहेत. 'पुरस्कारप्राप्त साहित्यिक' या विभागात ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची माहिती दिलेली आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई याच्या संकेतस्थळावरील (http://www.ybchavan.in) यशवंतराव चव्हाण यांची निवडक मराठी ध्वनिमुद्रित भाषणे (mp3फॉर्मेट मध्ये) 'भाषणे' या लिंकवर उपलब्ध केलेली आहेत तसेच http://rmvs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ध्वनीमुद्रीत असलेली मराठी पुस्तके 'श्राव्य पुस्तके' या लिंकवर उपलब्ध केलेली आहेत.
'आमच्याविषयी' या शीर्षकाखाली मराठी भाषा विभागाची स्थापना या बाबत प्रस्तावना, विभागाची संरचना आणि विभागातील अधिकाऱ्यांची माहिती व संपर्क ही माहिती प्रदर्शीत केलेली आहे. 'अंतर्गत संस्था' या शीर्षकाखाली भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या विभागांची थोडक्यात माहिती देऊन त्या विभागांच्या संकेत स्थळांची लिंकही देण्यात आलेली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करुन घेण्यासाठी मराठी भाषेचे तज्ज्ञ व संशोधक यांची गठीत करण्यात आलेली समिती आणि राज्याच्या राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी गठीत करण्यात आलेली कायम स्वरुपी भाषा सल्लागार समिती या बद्दलची संपूर्ण माहिती शासन निर्णयासहीत 'समित्या' या शीर्षकाखाली उपलब्ध आहे. विभागाच्या महत्वाच्या योजना व उपक्रमांची महिती 'उपक्रम' या शीर्षकाखाली तर 'पुरस्कार' या शीर्षकास क्लीक केल्यास मराठी वाङ्मय साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य आणि भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराविषयक माहिती दिलेली आहे.
'नागरिकांची सनद' या भागात प्रस्तावना, मराठी भाषा विभागाची रचना, कार्यपुर्तीचे वेळापत्रक, या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय, नागरीकांच्या गाऱ्हाणी व तक्रारींची निराकरण पद्धती, नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी, भाषा विभागातील आस्थापना विषयक संपूर्ण माहिती, भाषा संचालनालयाची माहिती, भाषा सल्लागार समितीची माहिती, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची माहिती, राज्य मराठी विकास संस्थेची माहिती व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची माहिती दिलेली आहे. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम ४ (१) (ख) मधील १७ बाबींवरील विभागाची संपूर्ण माहिती 'माहितीचा अधिकार' या शीर्षकाखाली देण्यात आलेली आहे. मराठी भाषा विभागाशी संपर्क करून काही सुचना किंवा अभिप्राय द्यावयाची सुविधा 'सुचना/ अभिप्राय' या शीर्षकाखाली देण्यात आलेली आहे तर 'छायाचित्र दालन' या सदरात विभागाच्या विविध कार्यक्रमांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
लेखक : सुनिल पोटेकर
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 6/5/2020
हे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकार...
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे संकेतस्थळ
यामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी विषयक संकेतस्थळांची ...