অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोल्हापूर जिल्हापरिषद-संकेतस्थळ

कोल्हापूर जिल्हापरिषद-संकेतस्थळ

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ

श्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३५,२३,१६२ असून त्यापैकी नागरी १०,५०,३५३ व ग्रामीण २४,७२,८०९ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, १ महानगरपालीका, ९ नगरपरिषदा व १,०२८ ग्रामपंचायती आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ http://www.zpkolhapur.gov.in/ आहे. हे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना माहितीच्या अधिकाराचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या जिल्हा परिषदेने केला आहे. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ते लोकाभिमुख असावे यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणार्‍या कामकाजाच्या माहितचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणार्‍या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहेत.

या संकेतस्थळावर सर्व विभागांची माहिती, विभागप्रमुखांची नावे, त्या त्या विभागांकडील कामकाज, त्यांच्याकडील विविध योजना, कर्मचारी संख्या, त्यांच्या नावांसह त्यांच्याकडील कामांची जबाबदारी याची माहिती पाहायला मिळते  आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या कामकाजाबद्दल काही तक्रारी असतील किंवा चांगल्या कामाचे कौतुक करायचे असेल तर अशा नोंदी नोंदवण्याची सोय संकेतस्थळावर आहे.

जिल्हा परिषदेकडे शिपायांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत 15 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात सर्वाधिक आठ हजार संख्या शिक्षकांची आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत महिन्याकाठी किती रक्कम जमा झाली, जमा झालेली रक्कम नियमानुसार झाली का? आतापर्यंत ही रक्कम किती झाली आहे, यांसारखी माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला ऑनलाईन पाहता येणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचेही काम हलके झाले आहे.

भविष्य निर्वाह निधी किती मिळणार हे अगोदरच तेही ऑनलाईन कर्मचाऱ्यांना समजेल त्याशिवाय काही चूक झाली असेल तर त्याविरोधात लगेच तक्रार करता येणार आहे.  या संकेतस्थळावर गेल्यानंतर भविष्य निर्वाह निधी ऑपशन मारल्यास कर्मचाऱ्यांचे नाव येईल व प्रत्येक कर्मचाऱ्याची जन्मतारीख हाच त्यांचा पासवर्ड मारल्यानंतर निधीत जमा झालेल्या रकमेची माहिती मिळणार आहे.

आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन विकास प्रक्रियेतील हे आमचे प्रेरणास्त्रोत असतील. संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी  अपेक्षा जिल्हा परिषदेमार्फत बाळगण्यात आली आहे.


स्त्रोत :महान्युज

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate