पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग एक योजना राबवीत आहे जिचे नाव आहे केंद्र पुरस्कृत चारा विकास योजना. चारा व अन्नपदार्थ (फीड) संवर्धनासाठी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणारी ही योजना आहे. सन 2005-06 पासून ही योजना, तिच्या खालील चार घटकांसह, राबवली जात आहे -
२०१० पासून केंद्र पुरस्कृत चारा विकास योजनेत थोडेफार बदल केले गेले आहेत ज्यायोगे उपलब्ध असलेल्या चार्याचा जास्त कार्यक्षमतेने वापर करून घेता येईल. ह्यासाठी १४१.४० कोटी रूपयांची खर्चास मान्यता मिळाली आहे व ह्या योजनेमध्ये खालील नवीन घटक व तंत्रज्ञानाचा समावेश केला गेला आहे -
शिवाय, चालू घटक योजनेवरील अनुदाना खेरीज, चार्याचे ठोकळे बनवण्याच्या यंत्रणेस दिले जाणारे अनुदान ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे ज्यायोगे ह्या योजनेतील सहभाग वाढेल. तसेच कुरण-विकास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठीची जमिनीची मर्यादा, राखीव कुरणां सहित, ५-१० हेक्टर करण्यात आली आहे.
परिवर्तित / नवीन घटकाचे नाव |
लाभार्थी |
मदतीचा प्रकार |
प्रत्येकी किंमत (लाख रूपयांत) |
चार्याचे ठोकळे बनवणार्या यंत्रणेची स्थापना |
सार्वजनिक / खाजगी उद्योजक, सहकारी संस्था व स्व-मदत गटांसहित |
50:50 |
85.00 |
चराऊ कुरणे विकसित करणे, राखीव कुरणां सहित |
शेतकरी, जंगले व पशुसंवर्धन विभाग. पंचायतीच्या जमिनींवर तसेच अन्य सामाईक स्रोतांच्या वापराने चराऊ कुरणे विकसित करण्यासाठी स्वयं सेवी संस्था व ग्राम पंचायतीच्या यंत्रणेस सामील करून घेतले जाईल |
100:00 |
0.70 |
चराऊ गवताच्या बियाण्याचे उत्पादन व वितरण |
शेतकरी. राज्य सरकार SIA/सहकारी दुग्धविकास संस्था/स्वयंसेवी संस्थांना प्रकल्पाच्या अंमल बजावणी मध्ये सामील करून घेऊ शकतात. राज्य शासनाद्वारे, दर क्विंटलला रु. ५००० प्रमाणे, एकूण ३७,००० क्विंटल चारा-बियाणांचे उत्पादन केले जाईल व ते शेतकर्यांना वाटले जाईल. |
75:25 |
0.05 |
चारा चाचणी करणार्या प्रयोगशाळांचे जाळे बळकट करणे |
सध्या अस्तित्वात असलेली पशु वैद्यकीय कॉलेजे/ कृषी महाविद्यालयाच्या पशु-पोषण प्रयोगशाळा. चार्याच्या विश्लेषणासाठी लागणारी यंत्रणा / उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. मान्यताप्राप्त उपकरणांची यादी प्रसिद्ध केली जाईल. |
50:50 |
200.00 |
हाताने चालवण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय |
शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य |
75:25 |
0.05 |
विजेवर चालविण्याच्या तूस-कापणी यंत्राचा परिचय |
शेतकरी व सहकारी दुग्ध संघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य |
75:25 |
0.20 |
मुरलेला चारा बनवणार्या यंत्रणेची स्थापना |
शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य |
100:00 |
1.05 |
अझोला प्रकारच्या जोपासना व उत्पादन यंत्रणेचे प्रात्यक्षिक |
शेतकरी व सहकारी दुग्धसंघ / एटीएमए/ कृषि विकास केंद्रांचे सदस्य |
50:50 |
0.10 |
बायपास प्रथिने बनवणार्या यंत्रणेची स्थापना |
दुग्ध विकास संघ / ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे खाजगी क्षेत्रातील उद्योजक |
25:75 |
145.00 |
एरिया स्पेसिफिक मिनरल मिक्स्चर (एएसएमएम) / चार्याच्या गोळ्या / चारा उत्पादक यंत्रणांची स्थापना |
सार्वजनिक / खाजगी उद्योजक, सहकारी दुग्धसंस्था व ज्यांच्या प्रकल्पास कोणत्याही व्यापारी बँकेची परवानगी आहे असे स्व-मदत गट. फक्त यंत्रणा अथवा उपकरणांच्या खरेदीसाठी पैशाची तरतूद केली जाईल. |
25:75 |
100. |
स्रोत : destatalk
अंतिम सुधारित : 7/11/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...