जलसुरक्षक प्रणालीद्वारे भूजल पातळीचे दरमहा मोजमाप होणार.राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च २०१७ अखेर जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या पातळीची मोजणी केल्यानंतर ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानात पहिल्या टप्प्यात २३२ गावांत विविध कामे करून जलसंधारण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २२२ गावांमध्ये ही कामे सुरू आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी अडवून जिरवण्यात आले. त्यातही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २३२ गावांत ३१ हजार ९५६ .५३ हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण उपचार ७२०० कामांमधून राबविण्यात आले. त्यासाठी शासनाने १२१ कोटी रूपयांचा निधी खर्च केला. या कामांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरला. त्यातच यंदा पावसाळा चांगला झाल्याने खोलीकरण केलेले नाले, गाळ काढलेले तलाव आणि सर्व उपचारांमध्ये चांगल्या प्रमाणावर पाणी अडलं आणि जिरलं सुद्धा. याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला आहे. गतवर्षी मार्च २०१६ मध्ये जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी भुजल पातळी ही याप्रमाणे होती.
मुक्ताईनगर १३.३५ मीटर रावेर २०.३६, भुसावळ १४.५६, बोदवड १३.१८, यावल ३०.०८, जामनेर १०.७६, जळगाव २०.६७, धरणगाव ११.२५, एरंडोल ७.५०, चोपडा १७.७०, अमळनेर १४.१५, पारोळा ९.५०, पाचोरा ९.४६, भडगाव ९.२९, चाळीसगाव ९.७३ अशी नोंदविण्यात आली होती. तर यंदा म्हणजे मार्च २०१७ मध्ये झालेल्या मोजणीत समोर आलेली आकडेवारी याप्रमाणे - मुक्ताईनगर १४.१६ मीटर्स, रावेर २०.३२, भुसावळ १२.२७, बोदवड १२.४८, यावल २४.८४, जामनेर १०.०२, जळगाव १७.६५, धरणगाव ९.७८, एरंडोल ७.३८, चोपडा १६.४७, अमळनेर १३.१०, पारोळा ८.१९, पाचोरा ८.५७, भडगाव ८.९१, चाळीसगाव ८.७७ याप्रमाणे. या आकडेवारीवरून केवळ मुक्ताईनगर तालुक्याची जलपातळी घटलेली दिसत असून उर्वरित सर्वच तालुक्यात जलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
ही पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निरीक्षण विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही भूजल पातळी मोजली जाते. ऑक्टोबर महिन्यात आणि मार्च महिन्यात अशी वर्षातून दोन वेळा ही पातळी मोजली जाते. या मोजमापात अधिक अचूकता यावी यासाठी जिल्ह्यात १५४४ गावांमध्ये निरिक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यातील २६५ विहिरी व्यवहार्य नसल्याने उर्वरित १२७९ विहिरींची पातळी दर महिन्याला २५ ते ३० तारखेदरम्यान मोजण्यात येईल. यासाठी गावागावात जलसुरक्षक प्रणालीचे प्रशिक्षण गावांतील युवकांना देण्यात आले आहे. जलसुरक्षक या मोबाईल ॲपद्वारे ते ही माहिती अपलोड करू शकतील आणि ही माहिती साऱ्यांना उपलब्ध होऊ शकणार आहे. लवकरच ही प्रणाली कार्यान्वित होईल, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. अनुपमा पाटील यांनी दिली.
अ.क्र. |
तालुका |
सन २०१६ |
सन २०१७ |
वाढ/ घट |
पातळी(मीटर्समध्ये) |
पातळी (मीटर्समध्ये) |
|||
१ |
मुक्ताईनगर |
13.35 |
१४.१६ |
घट |
२ |
रावेर |
20.36 |
२०.३२ |
वाढ |
३ |
भुसावळ |
14.56 |
१२.२७ |
वाढ |
४ |
बोदवड |
१३.१८ |
१२.४८ |
वाढ |
५ |
यावल |
३०.०८ |
२४.८४ |
वाढ |
६ |
जामनेर |
१०.७६ |
१०.०२ |
वाढ |
७ |
जळगाव |
२०.६७ |
१७.६५ |
वाढ |
८ |
धरणगाव |
११.२५ |
९.७८ |
वाढ |
९ |
एरंडोल |
७.५० |
७.३८ |
वाढ |
१० |
चोपडा |
१७.७० |
१६.४७ |
वाढ |
११ |
अमळनेर |
१४.१५ |
१३.१० |
वाढ |
१२ |
पारोळा |
९.५० |
८.१९ |
वाढ |
१३ |
पाचोरा |
९.४६ |
८.५७ |
वाढ |
१४ |
भडगाव |
९.२९ |
८.९१ |
वाढ |
१५ |
चाळीसगाव |
९.७३ |
८.७७ |
वाढ |
लेखक - मिलींद दुसाने,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये जलय...
कमी आणि अनियमित पावसामुळे आपल्या राज्याला मागील का...
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या ...
दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शि...