दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृष्य परिणाम दिसायला आता सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 86 गावांपैकी 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल तर 14 गावे 80 टक्केच्या वर वॉटर न्युट्रल झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये एकूण 86 गावांची निवड करण्यात आली होती.
यात भंडारा तालुका-15, तुमसर-19, मोहाडी-15, पवनी-12, लाखांदूर-6, साकोली-10 व लाखनी 9 अशा 86 गावांचा समावेश होता. या गावात एकूण सुरु झालेल्या 1068 कामांपैकी 1025 कामे पूर्ण झाली आहेत. शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पद्धत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युट्र्रल टक्केवारी होय.
प्रकल्प आराखड्यानुसार सन 2015-16 अंतर्गत निवडलेल्या गावापैकी वॉटर न्युट्रल टक्केवारीनुसार 86 पैकी 59 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झालेली आहेत. शंभर टक्के वॉटर न्युट्र्रल झालेल्या गावांमध्ये तालुकानिहाय भंडारा-माटोरा, कवलेवाडा, पलाडी, गोलेवाडी, इटगाव, मोहाडी- मोहगाव, बच्छेरा, टांगा, देवाडा बु., नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव (क), कांद्री, शिवणी, खैरलांजी, बोरी (क), तुमसर- गर्रा बघेडा, दावेझरी (सी), आसलपाणी, मेहगाव, साखळी, चिखला, कोष्टी, खापाखुर्द, गोंडीटोला, पवनारा, गोबरवाही, पवनारखारखारी, सितासावंगी, कार्ली, रोंघा, आलेसूर, लेंडेझरी, पवनी- मिन्सी, पन्नासी, भिकारमिन्सी, शेगाव, चकारा, सुरबोडी, चिचाळ, साकोली- सातलवाडा, रेंगेपार, सालेबर्डी, जांभळी, मालूटोला, उसगाव, पार्थी, बरडकिन्ही, लाखनी- मोरगाव, खैरी, पिंपळगाव, लाखांदूर- तावशी, टेंभरी, कुडेगाव, तई बु., आसोला व इटान अशा 59 समावेश आहे. ऐंशी टक्केच्या वर वॉटर न्युट्रल झालेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील मानेगाव, नवरगाव, खुर्शीपार, माडगी, गराडा बु., गराडा खु., मंडणगाव, मोहाडी- करडी, उसर्रा, तुमसर- नवरगाव, येरली, पवनी- अड्याळ, साकोली-शेंदुरवाफा व पळसगाव अशा 14 गावांचा समावेश आहे. तर 50 टक्केच्या वर 11 गावांचा समावेश आहे. सन 2016-17 मध्ये 59 गावांची निवड करण्यात आली असून या गावात 372 कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अनेक कामांना सुरुवात झाली असून जलयुक्त शिवारमुळे गावांच्या सिंचन क्षमतेत निश्चितच वाढ होणार आहे.
माहिती संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा
स्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/3/2020
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या ...
राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक...
सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेल्या पुरुषवाडी या ...
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये जलय...