शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने मोठ्या प्रमाणात समुद्रामध्ये सोडली जात आहेत. गेल्या काही वर्षांत मानवनिर्मित प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा प रिणाम समुद्रातील मच्छीमारीवर झाला आहे. त्यामुळे माशांचे उत्पादन घटत आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या तज्ज्ञांनी दिला आहे. हवाई येथे नुकतीच "समुद्रातील वाढते प्रदूषण आणि त्याचा मत्स्योत्पादनावर होणारा परिणाम' या विषयी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेमध्ये 35 देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
रसायने, प्लॅ स्टिक कचऱ्यामुळे माशांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशा माशांच्या शरीरातही या रसायनांचे अवशेष सापडल्याने मानवी आरोग्यावरही याचा परिणाम होणार आहे. माशांच्या बरोबरीने समुद्रीय जैवविविधतेलाही धोका पोचलेला आहे. येत्या काळातील पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर विविध देशांच्या समन्वयातून मोहीम हाती घेण्यात येत आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोचीन संस्थान : स्वातंत्र्यपूर्वकाळातील ब्रिटिशांक...
पहिली गोष्ट म्हणजे हळूहळू काही वर्षांनी त्या प्रदे...
संयुक्त राष्ट्रांच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक सं...
विजेचे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी या विषयी...