टर्निप म्हणजे शलगम हे तारांकित पीक उच्चभ्रू श्रीमंत आणि तारांकित हॉटेलसाठीच याचा वापर केला जातो. कंदाचा आणि पानाचा भाजीसाठी वापर केला जातो. आहारदृष्ट्या अतिमहत्वाचे पीक आहे. आहारदृष्ट्या हे पीक श्रीमंत आहे.
१० ते १५ अंश सें. तापमान पोषक असत. अति थंडीत पीक चांगल येत. उत्तम निचरयाच्या मध्यम कसदार भरपूर सेन्द्रीययुक्त अतिभूसभुशीत एकरी ६ ते ८ टन शेणखत घातलेल्या जमिनीत टर्निपचं पीक चांगलं येत आणि कंदही चांगले पोसले जातात.
याचे आशियाई आणि युरोपीय अशा दोन गटात विभागणी केली जाते. युरोपियन गटात स्नोबॉल, गोल्डेन बाल. पर्पल टोप, आणि व्हाईट ग्लोब हे अति थंड हवामानातले मऊ कंद चवीला गोड असणारे वाण आहेत. स्नोबाल जातीचे कंद पांढऱ्या रंगाचे कुरकुरीत आणि गोड स्वादाचे असून ह्या वाणाची पान लहान सरळ हिरव्या रंगाची असून फक्त ५५-६० दिवसात तयार होतो. गोल्डेन बाल हा वाण फक्त ७५ दिवसात तयार होणारा पिवळसर सालीचा, लालसर गार, असणारा एकरी ८ ते १२ टन उत्पादन देणारा आहे. पर्पल टोप आणि व्हाईट ग्लोब या जातीचे कंद मोठे स्वादिष्ट असून ६० ते ६५ दिवसात तयार होऊन एकरी १० ते १२ टन उत्पादन देतात.
आशियाई वाण उष्ण हवामानात येता, पुसा श्वेता हा वाण पांढऱ्या रंगाचा ५० दिवसात तयार होणारा एकरी ८ ते १२ टन उत्पादन देणारी जात आहे. याशिवाय काही पुसा चंद्रिमा, पुसा स्वर्णीया, पुसा कांचन या संकरीत जाती आहे.
एकरी १ ते १” किलो सपाट वाफ्यात ३० x १५ सें.मी अंतरात युरोपीय जातीची सप्टेबर ते डिसेंबर आणि आशियाई जातीची जुलै ते सप्टेबर पर्यंत लागवड करावी. १ गोनी युरिया, २ गोण्या सुपर फोस्फेट, १” गोनी पोटाश या खतांच्या मात्रा घ्याव्यात. गरजेनुरूप पाणी देऊन शेत तणविरहित ठेवाव. एका ठिकाणी एकाच रोप ठेवाव. हलकी खांदणी करून कंदना भर द्यावी.
टर्निप काढणी योग्यवेळी करावी. उशीर झाल्यास कंद्ची प्रत खराब होते. तंतुमय आणि कडवट होतात. वर्गीकरण करून विक्रीसाठी पाठवावेत. टर्नीप म्हणजे शलगम. याची प्रायोगिक तत्वावर लागवड करून मार्केटचा जम बसल्यास या लागवडीकडे जरूर वळावे.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 5/20/2020
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
कमी धारणक्षेत्रामध्ये किफायतशीर शेती होऊ शकत नाही,...
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...