अळू, सुरण लागवडीविषयी माहिती
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करून जमीन तयार करावी. या पिकाची लागवड जून किंवा सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात करावी. लागवडीसाठी कोकण हरितपर्णी ही जात निवडावी. लागवड सरी- वरंबा पद्धतीने 90 बाय 60 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी हेक्टरी 15 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. माती परीक्षणानुसार हेक्टरी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 80 किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पिकाला पाणी द्यावे. पानांसाठी पहिली कापणी अडीच महिन्याने करावी. अशा तोडण्या नऊ महिने करता येतात. कंदाचा उपयोग करायचा असेल, तर सहा महिन्यात कंद तयार होतात.
सुरण या कंदवर्गीय पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी गजेंद्र, श्रीकीर्ती, श्रीप्रिया ही जात निवडावी. लागवड जून- जुलै महिन्यात करावी. पाण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पिकाची लागवड करावी. लागवड सरी- वरंब्यावर किंवा गादीवाफ्यावर करावी. लागवडीसाठी कंदाचा वापर करावा. 120सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून 90 से.मी. अंतराने लागवड करावी. लागवडीसाठी तिसऱ्या वर्षाचे कंद वापरावेत.संपर्क -
02426 - 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात कांदा या कंद भाजीच्या पिकाविषयी माहिती...
या विभागात मुळा या कंदभाजी पिकासंबधी सर्व माहिती द...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
शेवळा ही वनस्पती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, ...