उसाचे बियाणे सीड केन क्रॉप तयार करणे
जगात बहुतेक ठिकाणी उसाच्या पिकातलाच काही भाग पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून वापरला जातो. मात्र हे योग्य नाही कारण ह्यामध्ये चांगल्या बियाण्याची वैशिष्ट्ये ध्यानात घेतली जात नाहीत. अर्थात बर्याच शेतकर्यांना बियाण्याच्या दर्जाची फारशी पर्वा नसते आणि जे पर्वा करतात तेदेखील कापणी आणि पेरणीच्या वेळीच बियाणे निवडतात. बियाण्यासाठीचा ऊस रोगमुक्त आणि उत्तम दर्जाचा असावा अशी इच्छा असल्यास ती पूर्ण करण्याचा हा मार्ग नाही. बियाण्यासाठीचा ऊस वेगळा वाढवणे आणि सुरुवातीपासूनच शेतात सतत नजर ठेवून तो रोग आणि किडींपासून मुक्त ठेवणे गरजेचे आहे.
अर्थात रोगराईपासून दूर ठेवलेला ऊस बियाणे म्हणून उत्कृष्ट असेलच असे नाही. अशा उसात पाण्याचे प्रमाण भरपूर असणे आणि त्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असणे आवश्यक आहे. दर्जेदार बियाणे मिळविण्यात केलेली हेळसांड हेच जगभर सातत्याने चांगला ऊस सतत न मिळण्याचे मुख्य कारण आहे.
उसाच्या व्यापारी पिकामधूनच पुढील हंगामासाठीचे बियाणे मिळवल्याने रेड रॉट, विल्ट, स्मट, रॉटन स्टंटिंग आणि ग्रासी शूट ह्यांसारख्या रोग व विकृतींचा झपाट्याने प्रसार होऊन ह्याचा उत्पादनाच्या दर्जावर थेट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी बियाण्याचा ऊस वेगळा वाढवण्याची शिफारस केली जाते.
- बियाण्याचा ऊस तयार करण्यासाठी मातीमध्ये कोणतीही समस्या नसलेला (उदा. खारटपणा, आम्लता, पाणी साठणे इ.) व जमिनीच्या एकंदर पातळीपेक्षा वर असलेला भाग निवडा. तेथे जलसिंचनाची चांगली सोय हवी. जमीन चांगली नांगरून लावणीआधी १५ दिवस दर हेक्टरी २०-२५ टन ह्या प्रमाणात शेतावरचे खत घाला. रेट रॉट किडीचा प्रसार टाळण्यासाठी नाल्या खणून पाण्याचा निचरा व्यवस्थित करा तसेच ह्या भागात आजूबाजूचे पाणी शिरू देऊ नका.
- रोपवाटिकेमधून पूर्वी वाढविलेल्या पिकातून बियाण्याची निवड करा आणि सेट्स बनवा. RSD व GSD सारख्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी जंतुविरहित केलेलेच सेट्स वापरा.
- उगवणीचे प्रमाण चांगले राखण्यासाठी तसेच रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ऑर्गॅनोमर्क्युरियल ट्रीटमेंटचा तसेच ऊष्णतेचा वापर करा (हीट ट्रीटमेंट).
- सेट्सचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी दोन ओळींत कमी म्हणजे ७५ सेंमीचेच अंतर ठेवा.
- नेहमीच्या ऊस पिकापेक्षा बियाण्याचा दर २५% जास्त ठेवा
- पोषकद्रव्यांचा जास्त डोस द्या - दरहेक्टरी २५० किलो N + ७५ किलो P2O5 + १२५ किलो K2O
- वातावरणीय बाष्पीभवनाचे प्रमाण (ETo) तसेच पिकाची अंगभूत वैशिष्ट्ये (Kc) लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये भरपूर पाणी द्या.
- पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तसेच रोग व किडींचा प्रसार रोखण्यासाठी शेतातील तण सतत काढत रहा.
- रोग व किडींवर नजर ठेवण्यासाठी शेतातून सतत हिंडून पाहणी करा.
- जमिनीत इतर जातींची रोगग्रस्त खोडे-मुळे इ. शिल्लक असल्यास ती काढून टाका
- लॉजिंग, बाइंडिंग व प्रॉपिंगपासून पिकाचे संरक्षण करा.
७ – ८ महिन्यांत पीक तयार होते. असा पिकापासून मिळवलेल्या सेट्सवर दमदार फुटवे असतात. ह्याशिवाय त्यांच्यात अधिक आर्द्रता, पुरेशी पोषकमूल्ये, विघटनयोग्य साखरेचे अधिक प्रमाण असल्याने त्यांची वाढ चांगली होऊन त्यांपासून अंतिमतः चांगले व भरपूर व्यापारी उत्पादन मिळण्यास मदत होते.
मुख्य शेतात लावण्यासाठी सेट्स तयार करणे
- लावणीआधी एक दिवस बियाण्याची मशागत करा ज्यायोगे जास्त टक्केवारीने व एकसारखे पिक मिळू शकेल.
- बियाणांवर प्रक्रिया करून पेरणी आधी एक दिवस सेट्स तयार ठेवा.
- बियाणांच्या ह्या उसाच्या खोडावर मुळे व फुटवे नसावे.
- सेट्स कापताना कळ्या व फुटव्यांना इजा पोहोचू देऊ नका.
- दोन-तीन हंगामां नंतर बियाणे बदला. जुन्या उसाचा वापर करणे भागच असले तर त्याचा वरचा एक-तृतियांश भाग वापरा.
|
|
बियाण्यांचा आदर्श ऊस
- ७-८ महिने वयाच्या पिकापासून मिळवलेलेच बियाणे नेहमी वापरा.
- रेड रॉट, विल्ट, स्मट, रॅटन स्टंटिंग आणि ग्रासी शूट ह्यांसारख्या रोग व विकृतींपासून मुक्त असलेलाच ऊस वापरा.
- हाताळणी व ने-आण करताना फुटवे खराब होऊ देऊ नका
- फुटव्यात अधिक आर्द्रता, पुरेशी पोषकमूल्ये, विघटनयोग्य साखरेचे अधिक प्रमाण असावे.
- ह्या उसाच्या खोडावर मुळे व फुटवे नसावे.
- उत्कृष्ट दर्जा
|
स्त्रोत : Organic cultivation package of practicesTechnical Cooperation Project of Food and Agricultural Organization (FAO), New Delhi and National Center for Organic Farming (NCOF), Ghaziabad Prepared By: Maharashtra Organic Farming Federation (MOFF)
|
|
अंतिम सुधारित : 6/30/2020
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.